नगरपालिकाप्रशासकीयसामाजिक

बार्शीटाकळी नगर पंचायतची उदासीनता उघड

फेरीवाला प्रमाणपत्राचे वाटपच नाही

बार्शीटाकळी येथील २४७ फेरीवाला प्रमाण पत्र सात महिने वाटपच नाही.
वंचित युवा आघाडीचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांना तक्रार.
बार्शीटाकळी:-बार्शीटाकळी नगर पंचायत क्षेत्रातील फेरीवाले ह्यांचे सर्व्हे करून वर्षे लोटले असून सात महिन्या पासून २४७ प्रमाणपत्र वाटपा शिवाय पडून असल्याने वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी कार्यालय प्रमुख उगले ह्यांना धारेवर धरून मुख्य कार्यकारी अधिकारी सोनवणे यांच्या कडे तक्रार केली असून शुक्रवार पर्यंत वाटप करण्याचे आश्वासन उगले यांनी दिले आहे.
राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ प्रमाणे बार्शी टाकळी शहरात रीतसर फेरीवाले ह्याचे कडून अर्ज भरून घेण्यात आले.त्यात पात्र ठरलेले फेरीवाले ह्यांना प्रत्येकी १० हजाराचे वाटप देखील करण्यात आले.मात्र गेले सात महिने फेरीवाले ह्याचे प्रमाण पत्र तयार असून त्याचे वाटप अद्याप पर्यंत करण्यात आले नाही. वंचित युवा आघाडीचे पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करीत असताना उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याने आज कार्यालय प्रमुख उगले ह्यांना धारेवर धरण्यात आले.तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सोनोने ह्यांना देखील सदर प्रकारची माहिती देण्यात आली.त्यावर शुक्रवार पर्यंत प्रमाण पत्रे वाटप न केल्यास पोलीस तक्रार करण्याचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने देण्यात आला.ह्यावेळी श्रीकांत घोगरे,  राजकुमार दामोदर,  दादाराव पवार,  आडे, अमोल जामनिक, अक्षय राठोड, भारत निकोशे, श्रावण भातखडे, दिनेश मानकर,श्रीकृष्ण देवकुणबी,रक्षक जाधव,जय तायडे, वैभव खडसे, विशाल वानखडे, रंजीत वरठे, विशाल गवई, सचिन शिराळे प्रामुख्याने उपस्थित होते.

Advt.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल