ग्रामीण वार्ताप्रशासकीयमहाराष्ट्र

बार्शीटाकळी भुमीअभिलेख कार्यालयात शुकशुकाट

 

बार्शीटाकळी भुमीअभिलेख कार्यालयात शुकशुकाट

कार्यालयीन वेळ उलटूनही फक्त एक कर्मचारी हजर

कर्मचारी मुख्यालयी न राहता अकोल्याहून अपडाऊन करतात

उपअधीक्षकच वेळेवर येत नसल्यामुळे ,कर्मचाऱ्यांचे चांगभलं

ग्रामीण भागातून आलेल्यांना ताटकळत बसावे लागते

ऐजंट मार्फत काम लवकर मार्गी लागत असल्याची कुजबुज

श्याम ठक
बार्शीटाकळी:
बार्शीटाकळी तालुक्यातील शेवटचे गाव म्हणजेच मोऱ्हळ .. तेथपर्यंत बार्शीटाकळी तालुक्याची सीमा येते. तेथून किंवा अन्य लांबवरच्या गावावरून ,कार्यालयीन कामासाठी बार्शीटाकळीला यायचे म्हटल्यास संपूर्ण दिवस खर्ची पडतो ,आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो ,तो वेगळाच .बार्शीटाकळी शहरातील बहुतांश कार्यालयातील कर्मचारी हे मुख्यालयी न राहता ,अकोल्याहून ये -जा करतात. परिणामी बऱ्याचदा कर्मचारी निर्धारित केलेल्या वेळेत न येता उशीराने कार्यालयात येतात. बऱ्याच कार्यालयाचे प्रमुख सुद्धा याला अपवाद नाहीत. आज दि.०९ मे २०२४ रोजी सकाळी १०:३० ते ११ च्या दरम्यान दैनिक पुण्यनगरी तालुका प्रतिनिधीने, भुमीअभिलेख कार्यालय गाठून या सर्व बाबींची शहानिशा केली असता ,भुमीअभिलेख कार्यालयात फक्तं एक कर्मचारी हजर असल्याचे आढळून आले .ईतर कोणतेही अधिकारी,कर्मचारी आढळुन आले नाहीत.तसेच या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागतात.परंतु खासगी व्यक्तीच्या माध्यमातून जर तुमची फाईल गेली तर जलदगतीने काम पुर्णत्वास जाते. हा सावळा गोंधळ लवकरात लवकर दुर करून ,येथे येणाऱ्या नागरिकांच्या कामाची वेळेवर पुर्तता करण्यात यावी. वारंवार चकरा मारून कंटाळलेल्या नागरिकांमधुन अशी कुजबुज ऐकायला येते.
याबाबत उपअधिक्षकांची प्रतिक्रिया मिळून आली नाही कारण ते सुद्धा आपल्या विभागात हजर नव्हते.
कर्मचारी हजर नसतांना विजेचा होत असलेला अपव्यय पहायला मिळाला. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत विजेचा अपव्यय का ? असा प्रश्न उपस्थित झाला तर वावगे वाटु नये ..

चौकट

भुमीअभिलेख कार्यालयात खाजगी ईसमाद्वारे महत्वाची व गोपनीय माहिती असलेले दस्तऐवज हाताळल्या जात आहेत. येथे कार्यरत अधिकारी/कर्मचारी हे पुर्णतः ह्या खाजगी ईसमावर अवलंबून असल्याचे समजते. शासनाने नेमून दिलेली कामे स्वतः न करता खाजगी व नियमबाह्य व्यक्ती कडून केले जात आहे. महसूल विभागातील अशा प्रकारची अनागोंदी थांबणे गरजेचे आहे.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल