ताज्या घडामोडी

कानोसा ब्रेकिंग… मंगरुळपीर येथे अंगणवाडी गोडावुनमध्ये भीषण आग

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही...

ब्रेकिंग..
मंगरूळपीर शहरातील मंगलधामस्थीत अंगणवाडीचा मोठ्या प्रमाणात कीराणा खाद्य आहार असलेल्या गोडाऊनला भिषण आग लागली असुन अग्निशमन दलाचे प्रमुख आनंद खीराडे, राहुल शिंगारे,प्रसिद्ध भगत सह तसेच मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनची टीम आगीवर नियंत्रण आणुन आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.*

🔥 *मिळालेल्या माहितीनुसार आगीचे कारण गोडाऊन मधे उपस्थित कामगार हे स्वयंपाक करीत होते स्वयंपाक करत असतानाच अचानक गॅस सिलेंडर ची नळी फाटल्याने सिलेंडर भडकले तेव्हा उपस्थित कामगार आरडाओरड करत मदती करीता बाहेर आले तो पर्यंत क्षणार्धात गोडाऊन मधे आग पसरली असल्याचे गोडाऊन मधील कामगारांकडून सांगण्यात आले*

*पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक शाखा मंगरूळपीर टीमचे प्रमुख अतुल उमाळे,गोपाल गीरे, लखन खोडे,राजेश भारस्कर,शुभम भोपळे,हे जिवरक्षक दिपक सदाफळे यांच्या फोनवरुन मार्गदर्शनात मोठ्या शिताफीने आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहेत गोडाऊन मधे अंगवाणवाडी चा आहाराचा भला मोठा साठा असल्याची माहीती असुन यामध्ये एक घरगुती गॅस सिलेंडर असल्याची माहीती होती जेसीबीद्वारे सिलेंडर आता बाहेर काढले आहेत सिलेंडर मधुन गॅस निघणे चालु आहे यामुळे काही घटना घडणार नाही याची दखल घेत तसेच आजुबाजुला वस्ती घरे असल्याने इतरांना आपल्या घरातील गॅस कनेक्शन सिलेंडर बंद करून ठेवण्यासाठी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन चे जवान विनंती करत आहेत. _यावेळी वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. मॅडम वरचेवर संपर्क साधून आहेत मंगरुळपीर उप विभागीय अधीकारी राजेंद्र जाधव सर तहसीलदार शितल बंडगर मॅडम तसेच ठाणेदार आडे सर सह पोलीस कर्मचारी मदत करत आहेत_नगरपरिषद

http://https://youtu.be/GbkzV2eF79E?si=PiUiCV_w2HtnvMOX

चे सिईओ शेवदे सर सह न.प.चे सर्व अधिकारी कर्मचारी हजर आहेत आपत्ती व्यवस्थापन अधीकारी शाहू भगत हे सुद्धा संपर्कात आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असुन यात कुठलीही जिवितहानी झाली नसुन मात्र मोठ्या प्रमाणावर कीराणा जळुन खाक झाला आहे

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल