क्राईम

एक कोटी खंडणीसाठी ,स्क्रॅप व्यापाऱ्याचे अपहरण.. अकोला पोलीसांनी ५ आरोपींना गजाआड केले .

चिव-चिव बाजारात रात्रभर ठेवून सकाळी गाठले कान्हेरी सरप; एक कोटी रुपये खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण, पाच जणांना अटक

अकोला: एक कोटी रूपये खंडणी मागण्याच्या उद्देशाने अपहरण करण्यात आलेल्या ,अकोल्यातील रिकाम्या काचेच्या बाटल्यांचे प्रसिद्ध व्यापारी यांची सुटका झाली असून, या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे.दोन दिवसांपूर्वी रात्री साडे दहाच्या सुमारास झालेल्या एका व्यापाऱ्याच्या अपहरणाने अकोला शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील रामदास पेठ पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या रायली जीन परिसरात व्यवसाय करणारे अरुण वोरा या व्यवसायिकाचे अज्ञात आरोपींनी अपहरण केले होते. आरोपी एक दोन तास वोरा यांच्या करिता दबा देऊन होते. मात्र संधी मिळताच त्यांनी वोरा यांचे अपहरण केले.विशेष म्हणजे या अपहरणकर्त्यांमध्ये एक आरोपी अरुण वोरा यांच्या कारखान्यात अनेक वर्षांपासून काम करणारा आहे. आरोपींनी वोरा यांना डोळ्यावर पट्टी आणि हाथ पाय बांधून गाडीत बसवून शहरालगतच्या भागात फिरवून मध्यरात्री शहरातीलच चिव चिव बाजारात रात्रभर ठेवले. यानंतर पहाटे आरोपींनी वोरा यांना शहरापासून 15 किलोमिटर असलेल्या कान्हेरी सरप या गावात एका ठिकाणी कोंबून ठेवलं. मात्र या काळात आरोपींना वोरा यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधता आला नाही. त्यामुळे ते खंडणीची मागणी सुद्धा करू शकले नाही. शेवटी पोलीस आपल्या पर्यंत लवकरच पोहचणार असल्याची खुमखुमी लागताच काल रात्री आरोपींनी वोरा यांना एका ऑटोत बसवून घरी पाठवले,असा घटनाक्रम समोर आला.

स्थानिक गुन्हे शाखेनी सीसीटिव्ही आणि ऑटो चालकाच्या माध्यमातून 5 आरोपींना अटक केली असून, यामध्ये एक आरोपी दिव्यांग आहे.पोलिसांनी या घटनेत वापरण्यात आलेली दोन पिस्टल आणि एक चार चाकी वाहन सुद्धा जप्त केल आहे. या आरोपीं विरुद्ध दरोडा , आर्म ॲक्ट सह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी आज सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

आतापर्यंत पोलीसांनी मिथुन उर्फ मोटी सुधाकर इंगळे (रा.जुना आळशी प्लाटचे बाजूला बाजुला चिवचिव बाजार अकोला), किशोर पुंजाजी दाभाडे( रा. ग्राम कळंबेश्वर ता+जि. अकोला) , फिरोज खान युसूफ खान रा. जुना आळशी प्लाटचे बाजुला अकोला , शरद पुंजाजी दाभाडे (रा. ग्राम कळंबेश्वर ता+जि. अकोला) ,अशिष अरविंद घनबाहादुर (रा. बोरगाव मंजु) यांना ताब्यात घेतले आहे. तर राजा सरफराज खान (रा. कान्हेरी सरप) , चंदु इंगळे (रा. खदान अकोला) या दोघांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अकोला बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे , उपविभागिय पोलीस अधिकारी सतीष कुलकर्णी , पो.नि शंकर शेळके स्थागुशा अकोला, पो.नि मनोज बहुरे पो. स्टे रामदास पेठ यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल