गेलेल्या १३ मोटरसायकली जप्त,बार्शीटाकळी पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी
बार्शीटाकळी पोलीसांची मोठी कारवाई.
चोरी गेलेल्या १३ मोटरसायकली जप्त
मोटारसायकल चोर गॅंगचा म्होरक्या यवतमाळ जिल्ह्यातून जेरबंद
बार्शीटाकळी:
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील प्रत्येक भागात मोटारसायकल चोरीच्या घटना सर्रास घडत होत्या. मोटारसायकल चोरीच्या या वाढत्या घटनांनी शहरवासीयांची झोप उडवली होती. त्याच बरोबर पोलिसांच्या कार्यपद्धती वरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते . हे पाहता पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांनी बार्शीटाकळीचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांना चोरीच्या घटनांना आळा घालण्याचे व चोरीच्या घटनांचा तपास करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन व वरिष्ठांच्या आदेशानंतर तपासाला गती दिली .स्थानिक रमेश नगर येथील रहिवासी प्रदीप गौतम निखाडे याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता ,त्याने शहरातील काही ठिकाणाहून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या मोटरसायकली दिग्रस (जि. यवतमाळ) येथील रहिवासी मोहसीन एस. कुद्दूस ह्याला विकायचा. नंतर मोहसीन त्या चोरीच्या मोटारसायकली इतरांना विकायचा. प्रदीप निखाडे याच्या कबुली जबाबावरून त्याचा मित्र एस. मोहसीन यालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे समोर आले. आतापर्यंत बार्शीटाकळी पोलिसांनी त्यांच्याकडे दाखल १० प्रकरणातील १० ही गुन्हे उघडकीस आणले ही विशेष बाब म्हणता येइल.बाईक चोरांकडुन १३ मोटारसायकली जप्त केल्या आहेत ज्याची किम्मत ६,५८००० रुपये एवढी आहे.बार्शीटाकळी पोलीसांनी बाईक चोर गॅंगचा म्होरक्या गुलाब नौरंगाबादी रा.दिग्रस ह्याला अटक करून बार्शीटाकळीत आणले . सध्या तो पोलीस कोठडीची हवा खात असून ,त्याच्याकडून आणखी काही बाहेर येते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल . बार्शीटाकळी पोलीसांनी केलेल्या ह्या धाडसी कारवाई बद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सदर कारवाईमध्ये
जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चनसिंह ,अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे ,उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ,बार्शीटाकळी पोलीस निरीक्षक शिरिष खंडारे,एएसआई शेख फराज़, हेड कांस्टेबल राजु जौंधरकर,हेड कांस्टेबल नागसेन वानखड़े, पंकज पवार, मनीष घुगे ,ईश्वर पातोंड यांचा समावेश होता.