सामाजिक

परंड्यातील मायलेकं न सांगता घरून निघून गेले

बार्शीटाकळी पोलीसांत हरवल्याची तक्रार दाखल

परंड्यातील मायलेकं न सांगता घरून निघून गेले

बार्शीटाकळी पोलीसांत हरवल्याची तक्रार दाखल .

बार्शीटाकळी:
तालुक्यातील परंडा गावातील एक विवाहित महिला व तिचा ०३ वर्षाच्या मुलासह घरून निघून गेल्याची तक्रार दाखल.
सविस्तर वृत्त असे की बार्शीटाकळी पोलीसात दाखल केलेल्या माहितीनुसार ,तालुक्यातील परंडा गावातील सौ.शीतल दिनेश कोकाटे वय ३० वर्ष व मुलगा देवांश दिनेश कोकाटे वय ०३ वर्षे याला घेऊन, दि.१० मे २०२४ रोजी दुपारी ३:३० वाजेच्या दरम्यान कुणालाही न सांगता घरून निघून गेली. आजूबाजूला शोध घेतला असता ते दोघे मिळून आले नाही. करिता दिनेश सिधाजी कोकाटे यांनी बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला पत्नी व मुलगा घरून निघून गेल्याची माहिती दिली. त्याआधारे बार्शीटाकळी पोलीसांनी मिसिंग क्रमांक २८/२०२४ नुसार प्रकरण दाखल करून पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु केल्याचे समजते. तसेच उपरोक्त स्त्री व तीचा मुलगा कुणालाही दिसून आल्यास आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती देण्याचे आवाहन बार्शीटाकळी पोलिसांनी केले आहे.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल