क्राईममहाराष्ट्रविशेष

बार्शीटाकळी पोलीसांची मोठी कारवाई.

मोटारसायकल चोर जेरबंद ८ मोटारसायकली जप्त, अजून ८ मोटारसायकलींचा शोध सुरू आहे

बार्शीटाकळी पोलीसांची मोठी कारवाई.

मोटारसायकल चोर जेरबंद

८ मोटारसायकली जप्त, अजून ८ मोटारसायकलींचा शोध सुरू आहे

बार्शीटाकळी:
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील प्रत्येक भागात मोटारसायकल चोरीच्या घटना सर्रास घडत होत्या. मोटारसायकल चोरीच्या या वाढत्या घटनांनी शहरवासीयांची झोप उडवली होती. त्याच बरोबर पोलिसांच्या कार्यपद्धती वरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते . हे पाहता पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांनी बार्शीटाकळीचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांना चोरीच्या घटनांना आळा घालण्याचे व चोरीच्या घटनांचा तपास करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन व वरिष्ठांच्या आदेशानंतर तपासाला गती दिली .स्थानिक रमेश नगर येथील रहिवासी प्रदीप निखाडे याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता ,त्याने शहरातील काही ठिकाणाहून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या मोटरसायकली दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील रहिवासी मोहसीन एस. कुद्दूस ह्याला विकायचा. नंतर मोहसीन त्या चोरीच्या मोटारसायकली इतरांना विकायचा. प्रदीप निखाडे याच्या कबुली जबाबावरून त्याचा मित्र एस. मोहसीन यालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे समोर आले. सध्या पोलिसांनी ८ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. त्याच्या इतर साथीदारांकडून आणखी ८ मोटारसायकली जप्त करण्यासाठी बार्शीटाकळी पोलीस दिग्रसमध्ये ये -जा करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे फक्त प्यादे आहेत, चोरांचा म्होरक्या कोणीतरी आहे जो सध्या फरार आहे. त्याला शोधण्यात पोलीस कोणतीही कसर सोडत नसल्याचे दिसत आहे. बार्शीटाकळी पोलीसांनी केलेल्या ह्या धाडसी कारवाई बद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सदर कारवाईमध्ये
जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चनसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ,बार्शीटाकळी पोलीस निरीक्षक शिरिष खंडारे,एएसआई शेख फराज़, हेड कांस्टेबल राजु जौंधरकर,हेड कांस्टेबल नागसेन वानखड़े, पंकज पवार, मनीष घुगे ,ईश्वर पातोंड यांचा समावेश होता. ।

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल