डॉक्टर वेलक्युर असोसिएशन बार्शीटाकळी तर्फे भव्य रोग निदान शिबीर संपन्न
४०० च्या वर रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ
डॉक्टर वेलक्युर असोसिएशन बार्शीटाकळी तर्फे
भव्य रोग निदान शिबीर संपन्न
४०० च्या वर रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ
श्याम ठक
बार्शीटाकळी:दि.२६ जानेवारी २०२४
बार्शीटाकळी शहरात भव्य रोग निदान व उपचार शिबिर संपन्न .
आपल्या देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या पर्वावर ,आपण समाजाला काही देणे लागतो ह्या भावनेतून,बार्शीटाकळी येथील डॉक्टर वेलक्युअर असोसिएशनने दि.२६ जानेवारी २०२४ शुक्रवार रोजी ,स्थानिक दयावान फंक्शन हॉलमध्ये ,भव्य रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन केले होते. सदर शिबिरात,अकोल्यातील नामांकित वैद्यकीय मंडळीनी विविध प्रकारच्या आजाराचे निदान व उपचार केले. आज रोजी पार पडलेल्या रोगनिदान व उपचार शिबिरात विविध आजाराच्या ४०० रुग्णांनी लाभ घेतल्याचे आयोजकांनी ,आमच्या प्रतिनिधी सोबत बोलतांना सांगितले. ह्या शिबिराला यशस्वी करण्यासाठी
डॉक्टर वेलक्युअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सैयद तनवीर जमाल, डॉ माजिद अली ,डॉ नासिर क़ाज़ी,डॉ जूनेद अली,डॉ काशिफ़ ख़ान,डॉ तहसीन ,डॉ वासिल , डॉ रवि कापकर,डॉ.डी.एम. काकड़ ,डॉ सुनील जाधव ,डॉ .शशि जाधव डॉ. तज़िम , डॉ ख़ालिद,डॉ सलमान, डॉ.गुलाम रसूल ईनामदार, डॉ काज़िम व डॉ.साजिद शाह ह्यांनी अथक परिश्रम घेतले.
शिबिरा मध्ये खालील सेवा प्रदान केल्या
• फुफ्फुसाचे रोग, COPD, ILD, TB, दमा (Asthma), एलर्जि
• श्वसन संबंधी रोगावर उपचार
• कोविड बरा झाल्यानंतरच्या समस्यांचे उपचार
• हाडांचे रोग, फॅकचर, मनिचा त्रास, पोठ, कमरीचा त्रास, व गुडघेदुखी, मण्क्याचा त्रास, वात, ईत्यादी
• उच्च रक्तदाब, हृदयविकार निदान व उपचार
• मधुमेह, थॉयरॉईड निदान व उपचार
• फिट्स व पॅरालिसीस निदान व उपचार
• लिव्हर, किडनी, रोग निदान व उपचार
• डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया व इतर साथीचे रोग
• स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ, स्त्री रोग सबंधीत आजारांचे निदान
• लिव्हर व पोटसंबंधीत सर्व आजारांवर निदान व उपचार
विनामूल्य उपलब्ध सुविधा
• ब्रीदोमीटर ने फुफ्फुसाची तपासणी हिपॅटायटीस स्क्रीनिंग (HbSAg/Hcv)
• गरजु पहीले ३० पेशेंटची मोफत फुफ्फुसाची तपासणी (PFT) / ECG
• पहील्या m ३० पेशेंटची मोफत BMD द्वारे हाडांची तपासनी शुगर टेस्ट / बी.पी.
• रक्त तपासणी, X-Ray, 2D Echo, अँजिओग्राफी सवलतीच्या दरात
अकोल्याहून शिबिरात सेवा देणाऱ्या डॉक्टरांची नावे
डॉ. इकरार राजा
M.B.B.S, D. Ortho अस्थि रोग विशेषज्ञ
डॉ. मेहविश खान राजा
MBBS, DGO स्त्री रोग विशेषज्ञ
डॉ. हुनैफा फरज़ान खान
MBBS, DNB (GEN. SURGERY) जयरल य सांस्कोपीक सर्जन विशेषा
डॉ. प्रितेश इंगोले
DM Cardiologist हृदयरोग विशेषज्ञ
डॉ. आरमा ई. शेख
MBBS, MD फुफ्फुस रोग, ऍलर्जी विशेषज्ञ
डॉ. इरफान एम शेख MBBS OCH बालरोग नवजात शिशु विशेषज्ञ
डॉ. मतीन अहेमद शेख
फुफ्फुस रोग, ऍलर्जी विशेषज्ञ
डॉ. शिवाजी वी. ठाकरे MBBS, MO MEDICINE, DNB (GASTRO)
गॅस्ट्रो लिकर प्राणि पोटविकार विशेषज्ञ
डॉ. आयेशा खान
M.B.B.S, MD हृदयरोग, बास्रोईड मधुमेह विशेषज्ञ
डॉ. फैज़ान अहेमद अंसारी
Consultant Nephrologist (MI, OM, Nephrology) किडनी विशेषज्ञ
डॉ. फरहान वासित खान
M.B.B.S, D. ORTHO अस्थि रोग विशेषज्ञ
डॉ. समीत तुलजापुरे
M.B.B.S, M.S., DNB विशेषज्ञ
Advt.
Thank you so much