सोनगीरी शेत शिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ
सोनगीरी शेत शिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ
गोपाल ढोरे ह्या शेतकऱ्याची १५ महिन्याची काऱ्होड मृत्युमुखी
बार्शीटाकळी:
बार्शीटाकळी शहरापासून जवळ असलेल्या सोनगीरी – राजंदा शेत शिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकुळ.
सोनगीरी येथील युवा शेतकरी गोपाल ढोरे यांच्या ,राजंदा शिवारात असलेल्या शेतात ,गाय ,बैल व इतर पाळीव प्राणी असतात.सुदैवाने आतापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडल्या नसल्याने हा शेतकरी निस्छिंत होता . परंतु दि.०८ मे २०२४ च्या रात्री अज्ञात वन्यप्राण्यांने ,त्यांच्या मालकीच्या १५ महिने वय असलेल्या काऱ्होडीचा बळी घेतला.शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान तर झाले आणि सोबतच त्या काऱ्होडीला नाहक जीव गमवावा लागला. वन विभागाच्या वन्य जीव संरक्षक अधिकाऱ्याशी ,गोपाल ढोरे ह्या शेतकऱ्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ,संबंधित अधिकाऱ्याचा मोबाईल बंद येत होता. प्रशासनाने ह्या वन्यजीव प्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान व पाळीव प्राण्यांचे नाहक बळी जाणे थांबवावे अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.