क्राईमग्रामीण वार्तासामाजिक

बार्शिटाकळीच्या ठाणेदारांनी रोखला जामवसु येथील बालविवाह

बार्शिटाकळीच्या ठाणेदारांनी रोखला जामवसु येथिल बालविवाह

श्याम ठक
बार्शीटाकळी:-
पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जामवसू येथील ४ मे रोजी होणारा बालविवाह विधीवत संपन्न होण्यापूर्वीच ठाणेदार शिरीष खंडारे व त्यांचा पोलीस ताफा,बालकल्याण समितीला रोखण्यात यश आले. बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जामवसु येथील एका अल्पवयीन मुलीचा काजळेश्वर येथील मुलासोबत बालविवाह ठरल्याची माहिती मिळाल्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांच्या आदेशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी मूर्तिजापूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशनचे एपीआय पडघान, धाबा पोलीस चौकीचे बीड जमादार धनराज राऊत आपल्या पोलीस ताफ्यासह बालकल्याण स समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन थेट जामवसुत पोहोचले. बालविवाह होन्याआधीच त्यांनी मुला मुलींच्या आई वडिलांसोबत चर्चा करून त्यांना समजपत्र दिले व आवश्यक दस्तऐवजासह बाल कल्याण समिती समोर सोमवारी हजर राहण्याचे फर्मान सुद्धा दिले. या घटनेमुळे वऱ्हाडी मंडळी, पाहुण्यांनी व डिजे वाल्याने मंडपातून धूम ठोकल्याचे समजते

ग्रामरक्षण समित्या फक्त कागदावर
तालुक्यात ग्रामस्तरावर होणाऱ्या अवैध व गैरप्रकाराला प्रतिबंध घालण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर ग्रामरक्षण समित्यांची स्थापना करण्यात आली. परंतु या समित्या फक्त कागदावरच असून बालविवाहासारखे गंभीर प्रकार घडत असताना सुद्धा कोणतीही दखल तालुक्यातील अनेक समित्या घेत नसल्याचे या प्रकारामुळे समोर आले आहे.
ग्रामस्तरावर होणारा बालविवाह व इतर गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी सरपंच ,पोलीस पाटील ,ग्रामसेवक ,आरोग्य सेविका ,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्यासह इतर सदस्य यांच्यावर ग्रामरक्षण समितीची जबाबदारी आहे.

तालुक्यात पोलीस पाटलांची अनेक पदे रिक्त
तालुक्यात पोलीस पाटलांची अनेक पदे रिक्त असून पाच ते सहा गावांचा प्रभार एकाच पोलीस पाटलाकडे सोपविण्यात आल्याने नेमके कोणत्या गावातील गैरप्रकाराबाबत देखरेख ठेवावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल