जिल्हाजिल्हा परिषदताज्या घडामोडीप्रशासकीयरस्ते महामार्गविशेष

बार्शीटाकळी तहसीलदार साहेब जरा ध्यान द्या !!

कधीही या आणि कधीही जा हे नित्याचेच झाले आहे.!!

बार्शीटाकळी तहसीलदार साहेब जरा ध्यान द्या !!

कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात येण्या जाण्याच्या वेळा तपासा !!

कधीही या आणि कधीही जा हे नित्याचेच झाले आहे.!!

http://https://youtu.be/uub29maF4Ts?si=Jm1KMR34F2R6jtpn

कडक उन्हात नागरिकांना ताटकळत बसावे लागते .

श्याम ठक
बार्शीटाकळी:
तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कर्तव्यावर येण्या- जाण्याच्या वेळा मनमर्जीने.
शासकीय कार्यालयाच्या वेळा सकाळी ९:४५ ते सायंकाळी ५:४५ असूनही वेळ पाळणाऱ्यांची संख्या नगण्य !
महाराष्ट्र शासनाने ,शासकिय कर्मचाऱ्यांच्या सोईसाठी पाच दिवसाचा आठवडा केला आहे. त्यानुसार प्रत्येक कर्मचारी/अधिकारी यांनी आप आपल्या कर्तव्यावर सकाळी ९:४५ ला पोहचावे व सायंकाळी ५:४५ ला कार्यालय सोडावे असा आदेश आहे. तसेच प्रत्येक कर्मचारी /अधिकारी आप आपल्या मुख्यालय ठिकाणीच राहायला हवे परंतु तसे होतांना आढळत नाही. ज्याठिकाणी अधिकारीच अप डाऊन करतात तिथे ते आपल्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमांनुसार वागण्याचे सांगु शकत नाही. म्हणून कर्मचारी ह्या संधीचा लाभ उचलून मुख्यालयी न राहता नजिकच्या शहरातून ये जा करतात. बार्शीटाकळी शहरातील ,शासकीय कार्यालयातील काही कर्मचारी/अधिकारी यांचा अपवाद वगळता बहुतांश मंडळी कर्तव्यावर वेळेत पोहचत नाहीत. कारण ते मुख्यालयी राहत नसल्यामुळे हे सर्व बिनबोभाटपणे सुरु आहे. आज डिजिटल युग म्हणून गवगवा केल्या जातो .. परंतु अनेक शासकिय कार्यालयात डिजिटल यंत्र बसवलेले नाहीत. आणि काही ठिकाणी असेलतर ते कार्यान्वित नसल्याची सुत्रांची माहिती आहे.

चौकट १
दि.०७ मे २०२४ रोजी सकाळी १०:२० मिनिटांनी तहसील कार्यालय व भुमी अभिलेख कार्यालयात कामानिमित्त गेलो असता अनेक नागरिक कामासाठी आलेले होते. परंतु दोन -चार कर्मचारी वगळता ईतर कुणीही उपस्थित नव्हते. सायंकाळी ५:४५ वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असूनही अन्न व नागरी पुरवठासह अन्य विभागातील कर्मचारी वेळेपूर्वीच कार्यालय सोडत असल्याचे निदर्शनास आले आहे.

चौकट २
सर्व अधिकारी, कर्मचारी यांना ,यापूर्वीच, वेळेवर आणि पूर्ण वेळ उपस्थित राहण्याबाबत सूचना दिलेली आहे, आज जे वेळेवर उपस्थित नव्हते त्यांना कारणे दाखवा नोटीस देवून स्पष्टीकरण मागविण्यात येईल.
राजेश वझिरे
तहसीलदार
बार्शीटाकळी जि.अकोला

चौकट ३
तहसील कार्यालयात ,कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी व मुत्रविसर्जन गृह अस्तित्वात नाही.
पुरूष उघड्यावर आपला कार्यभार उरकतात ,महिलांची मात्र कुचंबणा होत आहे..
गोपाल विश्वंभर ढोरे
सोनगीरी,बार्शीटाकळी

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल