सरकारी भाव ,सोयाबीन त्याचे नाव ,विकत घेत आहे खविसं बार्शीटाकळी गाव
बार्शीटाकळी येथे शासकीय दराने सोयाबीन खरेदीस सुरुवात
बार्शीटाकळी:०६फेब्रुवारी २०२४
बार्शीटाकळी येथे स्थानिक तालुका खरेदी विक्री संघामार्फत शासकीय दराने सोयाबीन खरेदी दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी अकरा वाजता संस्थेच्या प्रांगणामध्ये संस्थेचे अध्यक्ष गजाननरावजी घुमसे यांचे हस्ते काटा पूजन करून करण्यात आली.
शासनाने शेतकऱ्याची आर्थिक लूट होऊ नये यासाठी आधारभूत किंमत अंतर्गत सोयाबीन खरेदी ४६००/- रुपये या दराने खरेदी केंद्र सुरू केले. खरेदी केंद्र सुरू केले त्यानुसार शेतकरी राजेंद्र पाटील यांचा शेला नारळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विलासराव गोरले, संचालक सहदेवराव नानोटे , गजाननराव आखरे, व्यवस्थापक संतोष म्हैसने , विनोद बेटकर, गोपाल काळे , बाळकृष्ण उताने , मनोहर देशमुख आदी सह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने शासनाला सोयाबीन खरेदीसाठी सहकार्य करावे असे आवाहन तालुका खरेदी विक्री संस्थेमार्फत करण्यात येत आहे.
धन्यवाद