उत्सवमहाराष्ट्रविशेषसामाजिक

बार्शीटाकळी शहरात ,चिमुकल्यांची श्रमातुन शिवजयंती

वर्गणी होत नसल्यामुळे,चिमुकल्या मावळ्यांनी श्रम करून रुपये मिळवले

बार्शीटाकळी शहरात ,चिमुकल्यांची श्रमातुन शिवजयंती

पुरेसी वर्गणी होत नसल्यामुळे,चिमुकल्या मावळ्यांनी श्रम करून रुपये मिळवले

द ग्रेट मराठा मित्र मंडळाचे उत्कृष्ट आयोजन

बार्शीटाकळी:ता. २० फेब्रुवारी २०२४
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल दि.१९ फेब्रुवारी २०२४ सोमवार रोजी ,रात्री ७:०० ते १०:०० वाजेच्या दरम्यान मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी करण्यात आली.
तुमच आमचे, आमचे नाते काय. , जय जिजाऊ जय शिवराय’, छत्रपती शिवाजी महाराज की जय आदि गगनभेदी घोषणांनी अवघा आसमंत दणाणून गेला. निमित्त होते छत्रपत्री शिवरायांच्या ३९४ व्या जन्मोत्सवाचे… डोक्यावर फेटे, भगव्या टोप्या आणि नऊवारी साडी या मराठमोळ्या थाटात १९ फेब्रुवारीला शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, या निमित्ताने शाळकरी मुला मुलींकरीता भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये बहुसंख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. सोबतच शिवव्याख्याते अक्षय राऊत यांचे सुद्धा व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या व्याख्यानातून शिवाजी महाराजांचे जीवन अमलात आणण्याबद्दल सांगितले.. ते म्हणाले तुम्ही नुसतेच शिवाजी महाराज की जय म्हणून चालणार नाही. तर महाराजांना जे अपेक्षित होते त्याप्रमाणे तुमचे आचरण असले पाहिजे. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणु शकू. सतत तीन तास सुरु असलेल्या कार्यक्रमाला महिला व पुरूष वर्गासह चिमुकल्या मावळ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
ह्या कार्यक्रमाला बार्शीटाकळी शहरातील ,विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची उपस्थिती होती.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी द ग्रेट मंडळाचे
प्रिन्स करपे, हर्षल घाटे, राम बुजाडे, शुभम आढे,शिवम कराळे, यश मुळतकर,सार्थक रत्नपारखी,सोहम राऊत, गणराज करपे,प्रथमेश तिकार,अपूर्वा शिंदे,कु.राशी नीलखन,कु.वैष्णवी आढे, कु.कोमल भगत,कु. खुशी आकोत, प्रसाद आकोत,कु.ईश्वरी कापकर,कु.श्रध्दा कापकर ,कु. भक्ती पैठणकर,कु. वैष्णवी शेंदुरकर ,कु.श्रद्धा वाट ,कु. कृष्णाली निलखन ,कु.समृद्धी बुजाडे ,कु. साक्षी कावरे ,कु.आराध्या रिसोडकर ,कु.श्रेया शेवलकर , वेदांत करांगळे, कु. श्रावणी शेवलकर ,वैभव खाडे ,कृष्णा शिंदे ,वेदांत शेवलकर ,रुद्र आखाडे व कु.लक्ष्मी बडोदेकर
यांनी अथक परिश्रम घेतले .ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी निलखन व मयूरेश अग्रवाल यांनी केले. आभाराचा भार द ग्रेट मराठा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नरेश रत्नपारखी यानी वाहला.

चिमुकल्यांचे अविश्वसनीय शिवप्रेम
नगण्य वर्गणी व आयोजनाला लागणारा खर्च याचे गणीत जुळत नसल्याने,चिमुकल्या शिवभक्तांनी मेहनत करून पैसे उभे केले … त्यासाठी त्यांनी मिनरल वॉटर बॉटलचा, ट्रकातील माल खाली करुन दिला. त्याबदल्यात त्यांना काही रक्कम उभी करता आली … केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे या म्हणीचा अर्थ प्रत्यक्षात सदर कृतीतुन अमलात आला आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये …

भाषण स्पर्धा

भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. वैष्णवी आढे ,द्वितीय कु. वैष्णवी शेंदुरकर व कु.श्रद्धा वाट तर तृतीय क्रमांक कु. कोमल भगत हिने पटकावला. अन्य सहभागी स्पर्धकांना सहभाग पत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

द ग्रेट मराठा मंडळाची वाटचाल 

द ग्रेट मराठा मंडळाचे वर्षभर कल्पकतापुर्ण कार्य सुरुच असते. त्यामध्ये राष्ट्रीय सण १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला रस्त्यावर अनावधानाने पडुन असलेले राष्ट्रध्वज गोळा करून त्याची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावणे. पोळा सणाच्या दिवशी रस्त्यावरील राख्या उचलने. विशेष म्हणजेच शहरातील विविध भागातील गरजू विद्यार्थ्यानासाठी शिकवणी वर्ग चालवतात.यामधून मुला मुलीनां योग्य संस्कार सुद्धा आत्मसात करण्याबद्दल शिकविल्या जाते.ह्या शिकवणी वर्गात नरेश रत्नपारखी ज्ञानदानाचे कार्य पार पाडत आहेत.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल