क्राईमग्रामीण वार्ता

बार्शीटाकळीत अल्पवयीन आदिवासी मुलीचा घरात घुसून विनयभंग व मारहाण

आरोपीवर विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल 

बार्शीटाकळीत अल्पवयीन आदिवासी मुलीचा घरात घुसून विनयभंग व मारहाण
आरोपीवर विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल
श्याम ठक
बार्शीटाकळी:१९ फेब्रुवारी २०२४
शहरातील गवारीपुरा भागातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तीला मारहाण करण्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गवारीपुऱ्यातील ,आदिवासी समाजाच्या कु.सलोनी ( नाव बदललेले ) वय १५ वर्षे ही दि.१८ फेब्रुवारी २०२४ च्या रात्री  १० :०० ते १०:३० वाजेच्या दरम्यान  पिडीत अल्पवयीन मुलगी आपल्या घरात एकटी होती . तीची आई बाजुलाच बांधकाम सुरु होते तिथे होती . वडील कामावरुन परत आले नव्हते तर भाऊ  गावातच काही कामानिमित्त गेलेला होता. पिडीता घरात एकटी असल्याची संधी साधून आरोपी मो. साबीर मो.नासीर यांने त्या अल्पवयीन मुलीला कवट्यात पकडून तीचा विनयभंग केला. तसेच तीला तु कोणा सोबत बोलत असते ते सांग ! मी तुझे लग्न त्याच्यासोबत लावुन देतो असे  म्हणत , अश्शिल बोलून  पिडीतेला काठीने मारहाण सुद्धा केल्याचे  तक्रारीत नमूद आहे.  पिडीताने आरडाओरडा केल्यामुळे आरोपीने तेथून पळ काढला .तो पळुन जात असतांना पिडीताचे वडील कामावरून परत आले .तेव्हा त्यांनी सुद्धा आरोपीला ओळखले कारण सदर गुन्ह्यातील आरोपी  ,त्याच्या नातेवाईकांकडे नामे तैमुर सौदागर यांच्याकडे नेहमी येत जात असतो. आरोपीचे नातेवाईक असलेल्या तैमुर सौदागर व पीडीतेचे  घर एकाच मोहल्ल्यात असल्यामुळे ,आरोपीला सदर पीडीता ओळखत असल्याचे फिर्यादीत लिहलेले आहे. अचानक घडलेल्या प्रसंगाने पीडीता घाबरून गेली. पीडीतेने फिर्यादीत सांगितलेले आहे की आरोपी  मो. साबीर हा घरासमोरुन जातांना माझ्याकडे नेहमीच वाईट नजरेने बघत असतो.आणी आज दि.१८ फेब्रुवारी २०२४ च्या रात्री १०:०० ते १०:३० वाजेच्या दरम्यान तर त्याने कहरच केला .तो  थेट घरात घुसला. ह्या घटनेमुळे सदर कुटुंब घाबरून गेले आहे. आरोपीला कडक शासन व्हावे ह्या हेतूने ,पीडीता व तीच्या कुटुंबीयांनी , ह्या घटनेची बार्शीटाकळी पोलीसात तक्रार दाखल केली . पोलीसांनी तत्परतेने आरोपीला अटक केली. त्याच्यावर भांदवि १८६० अन्वये  ३५४,३५४ ड ,४५२,३२४ ,तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये कलम ८ व कलम १२ ,तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ( अत्याचार प्रतिबंधक )अधिनियम १९८९ अन्वये ३(१)(w)(i), ३(१)(w)(ii) & ३ (२) (va) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास बार्शीटाकळीचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे करत असल्याचे समजले.
Advt

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल