आरोग्य व शिक्षणविशेषसामाजिक

बार्शीटाकळी येथे वात रोग निदान व उपचार शिबीर

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्ताने आयोजन

बार्शीटाकळी येथे वात रोग निदान व उपचार शिबीर

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्ताने आयोजन

बार्शीटाकळी:
स्थानिक सोमवारपेठ येथे दि.१९ फेब्रुवारी २०२४ सोमवार रोजी भव्य वात रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वराज्य निर्माते शिवछत्रपतींच्या जयंती निमित्ताने दि.१९ फेब्रुवारी २०२४ सोमवार रोजी ENRISH फार्मास्युटिकल ह्या औषधी कंपनीच्या वतीने ,बार्शीटाकळी शहरातील सोमवार पेठ भागात असलेल्या अथर्व क्लिनिक येथे दि.१९ फेब्रुवारी २४ सोमवार रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ,भव्य वातरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात अकोला येथील प्रसिद्ध वातरोग तज्ञ डॉ.आदित्य उदय बुरजे हे रुग्णांचे निदान व उपचार करतील. ह्या शिबिराचा जास्तीतजास्त रुग्णांनी लाभ घेण्याचे कंपनीचे वैद्यकीय प्रतिनिधी नितेश वाघमारे यांनी आवाहन केले आहे.

 

वातरोगाची ठळक लक्षणे

जोडांचे किंवा सांध्यांचे दुखणे / सुजणे / सकाळी उठल्याबरोबर अडकणे किंवा ताठरणे. (Rheumatiod Arthritis)
सोरियाटीक रूग्णांना होणारे सांध्यांचे आजार. (Psoriatic Arthritis)
मणक्यांचे / कंबरेचे संधिवात. (Ankylosing Spondylitis)
झिजेमुळे किंवा वयामुळे गुढघ्यांचे किंवा सांध्याचे दुखणे. (Osteorarthritis)
हाडांची ठिसूळता. (Osteoporosis)
युरिक ॲसिड मुळे होणारा वात. (Gout)
स्पॉन्डिलायटिस. (Spondylitis)
मासपेशीचे दुखणे. (Soft Tissue Pains)

ऑटोइम्यून आजारांमध्ये दिसणारी ठळक लक्षणे

वारंवार तोंड येणे, ताप येणे, वजन कमी होणे, उन्हात गेल्यास त्वचेवर / चेहऱ्यावर लाज चट्टे (रॅश) येणे.
(Systemic Lupus Erythematosus)
डोळे व तोंडामध्ये खुप कोरडेपणा जाणवणे. (Sjogren’s Syndrome)
वारंवार डोळे लालसर होणे किंवा दृष्टी कमी होणे. (Autoimmune uveitis, scleritis)
वारंवार होणारे गर्भपात किंवा रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी तयार होणे. (Due to APLA Syndrome)
लवकर भरू न शकणारे घाव, अल्सर. (Due to Vasculitis)
रक्तवाहिन्यांची सूज. (Takayasu arteritis, GCA, PAN इत्यादी)
त्वचा चामड्यासारखी जाड होणे. (Scleroderma)
हातापायाची बोटे निळी, पांढरी किंवा काळी पडणे. (Raynaud’s Phenomenon)

संधिवात /ऑटोइम्यून आजारांमुळे होणार फुफ्फुसांचे आजार. (Interstitial Lung Disease) किडणींचे आजार (Nephritis) किंवा मायोसायटिस (Myositis)

शिबीर स्थळ: डॉ. रवी कापकर( अथर्व क्लिनिक)
नोंदणीसाठी संपर्क :- अंबाई मेडिकल आणि विदर्भ मेडिकल, बार्शिटाकळी

Advt.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल