ग्रामीण वार्ताप्रशासकीयमहाराष्ट्र

सरकारी योजनेसाठी ,शेतकऱ्याची जमीन परस्पर वापरली

युवक कॉंग्रेस कडून ग्रामसेविके विरूध्द गुन्हे दाखल करण्याची मागणी.

सरकारी योजनेसाठी ,शेतकऱ्याची जमीन परस्पर वापरली

युवक कॉंग्रेस कडून ग्रामसेविके विरूध्द गुन्हे दाखल करण्याची मागणी.

गुन्हे दाखल न झाल्यास आंदोलनाचा इशारा

बार्शीटाकळी:
तालुक्यातील सोनगीरी गावातील एका शेतकऱ्याची जमीन ,शासकीय योजनेसाठी परस्पर वापरल्याची घटना उघडकीस आली .
सविस्तर वृत्त असे की
तक्रारकर्ते गोपाल विश्वंभर ढोरे यांची वडिलोपार्जित शेतजमीन सोनगीरी शेत शिवारात आहे. त्या शेत जमीनीवर ,गट ग्राम पंचायत सोनगिरी -शहापुर येथील ग्राम सेविका संध्या हरीभाऊ चोटमल यांनी शेत मालकाची परवानगी न घेता परस्पर पुनर्भरण शौच खड्डा खोदला.त्यामुळे शेतमालकाचे नाहकच नुकसान झाले.त्यामुळे गोपाल ढोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह गटविकास अधिकारी बार्शीटाकळी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
यापूर्वी सुद्धा सदर ग्रामसेविके विरूध्द खातेनिहाय चौकशी करण्यासाठी अर्ज दिला होता परंतु संबंधीत अधिकाऱ्यांनी अजूनही त्याविषयी चौकशी केली नसल्याचे तक्रारीत नमूद केलेले आहे.त्यामुळे तक्रारकर्ते यांनी पुन्हा अर्ज दिला व ग्रामसेविकेची खातेनिहाय चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

चौकट
संबधित ग्रामसेविका यांनी दलीत पाणी पुरवठा योजनेचे काम न करता परस्पर निधी काढला . म्हणजेच सदरचा पाणी निधी चोरी गेल्या बाबत सुद्धा कारवाई व्हावी. मौजे सोनगीरी येथील गावाला लागून असलेल्या वडिलोपार्जित शेतात संबंधित ग्रामसेविका यांनी पुनर्भरण शौच खडडा शेतकऱ्यांची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे बांधला .एकंदरीतच ग्रामसेविका यांनी कर्तव्यात कसुर करून अनेक प्रकारचा भ्रष्टाचार केलेला आहे . मी या आधी दि. ३०/११/२०२३रोजी खातेनिहाय चौकशीचे पत्र पंचायत समीती कार्यालयात देऊन सुध्दा कोणतीही कार्यवाही करण्यात नाही आली . त्वरीत दखल न घेतल्यास , पंचायत समीती कार्यालयात आंदोलन करण्यात येईल. आणि आंदोलना दरम्यान होणाऱ्या जीवीत व आर्थिक नुकसानीस आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.
गोपाल विश्वंभर ढोरे
सोनगीरी ,बार्शीटाकळी

Advt.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल