जिल्हाप्रशासकीयमहाराष्ट्र

बार्शीटाकळी तहसिल कार्यालय “राम”भरोसे

५ दिवसीय आठवड्याचा फज्जा

बार्शीटाकळी तहसिल कार्यालय “राम”भरोसे

५ दिवसीय आठवड्याचा फज्जा

कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या महिला व पुरुषांकरीता मुत्रीघर नाही

श्याम ठक
बार्शीटाकळी:दि.०९ फेब्रुवारी
तालुक्यातील मुख्य प्रशासकीय कार्यालय असलेल्या तहसील कार्यालयात आज दि.०९ फेब्रुवारी २०२४ रोजी शुकशुकाट पहायला मिळाला .
शासकीय नियमाप्रमाणे पाच दिवसाचा आठवडा झाला आहे. कार्यालयात पोचण्याची वेळ ९:४५ निर्धारीत असल्यावर सुद्धा दि.०९ फेब्रुवारी २०२४ रोजी अनेक विभागाचे दारांना कुलूप आढळून आले .तहसील कार्यालयात असलेले बहुतांश अधिकारी व कर्मचारी हे अपडाऊन करतात. त्यांच्या मुख्यालयी न राहण्यावर वरिष्ठांचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे जाणवते.त्यामुळे तालुक्यातील गोर गरीब जनता ताटकळत बसलेली असते. निराधार विभाग तर स्वतःच आधारहिन झाला आहे. शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचे लाभार्थी विविध कामासाठी या विभागात येत असतात. परंतु त्यांना लहान सहान कामासाठी सुद्धा वारंवार खेटे घालावे लागतात. नियमांची पुरेशी माहिती नसल्यामुळे, सरकारी बाबू सांगतील त्याप्रमाणे बिनदिक्कत हजर होतात. परंतु त्यावेळीही त्यांचे काम मार्गी लागत नाही.अन्न पुरवठा विभाग ,नक्कल अर्ज विभाग व महसूल विभागात सुद्धा दि.०९ फेब्रुवारी २०२४ रोजी १०:०० वाजता शुकशुकाट होता.सध्या येथील तहसीलदार दुसरीकडे बदलून गेलेले आहेत. नविन अधिकारी आलेले नाहीत. त्यामुळेच कर्मचारी/अधिकारी यांचे मनमर्जीने कर्तव्यावर येणे सुरु आहे. निराधार व पुरवठा विभागात दलालांचा मुक्तपणे वावर निदर्शनास येतो.उपविभागीय अधिकारी यांना याबाबत अवगत केलेले आहे. तेव्हा ते काय कारवाई करतात हे पाहणे औत्स्तुक्याचे ठरेल.

तहसील कार्यालयात कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या पुरुष व महिलांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो. पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. तहसिलकार्यालयाच्या प्रांगणातील प्याऊ फक्तं नावालाच.. महिला व पुरुषांना मुत्रीघर सुद्धा उपलब्ध नाही. पुरूष उघड्यावरचं कार्यभाग उरकतात तर महिलांची होते कुचंबणा..

तहसील कार्यालयात असलेल्या विविध विभागात खाजगी ईसमांचा मुक्तपणे वावर आढळून येतो. त्यांच्या मार्फत आलेल्या फाईलीच तातडीने निकाली काढण्यात येत असल्याची सुत्रांची माहिती.

प्रतिक्रिये करिता सदर कार्यालयाशी संबंधीत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होवु शकला नाही.

Advt.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल