ग्रामीण वार्तामहाराष्ट्ररस्ते महामार्गसामाजिक

कापशीचे ग्रामस्थ म्हणतात, हायमास्ट लाईट शोभेचे का?

कापशीचे ग्रामस्थ म्हणतात, हायमास्ट लाईट शोभेचे का?

सहा महिन्या नंतरही नाही पडला प्रकाश
बार्शीटाकळी: दि ०८-०२-२०२४
कापशी रोड : येथील उडाणपुलावर व चौकात अंधारमय ठिकाणी प्रकाश पडावा या हेतूने
माॅन्टो कार्लो कंपनीकडून महामार्गाचे व उडाणपुलाचे काम करुन रस्त्याच्या बाजूला हायमास्ट लाईट लावला. उडाणपुल सुरु पासुन ते संपेपर्यंत व गावाच्या बाजुला व बाहेरील भागावर तसेच उडाणपुलाखाली अनेक खांबावर चाळीस ते पंन्नास मोठे पथदिवे लावले आहेत. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही त्यातून प्रकाश पडलेला नाही. परिणामी हे हायमास्ट खांब शोभेसाठी उभारला काय? असा सवाल कापशी रोडवासी विचारीत आहेत.
याविषयी ग्रामपंचायत प्रशासनाला विचारणा केली असता हायमास्ट खांब कधी लागला हेही माहीत नाही. तो खांब संबंधित बांधकाम करणाऱ्या कंपनीने उभारला. त्याला विजेचा पुरवठासुद्धा त्यांनीच करावा तेव्हाच ते सुरू होऊ शकते, असे मत सरपंच यांनी व्यक्त केले.
तब्बल सहा महिन्यांपासून शोभेची वास्तू ठरणारे हे हायमास्ट कधी सुरु होतील याकडे कापशीसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहेत .

बांधकामाला गती मिळेना
गावातील महामार्गाच्या बांधकामाला गती मिळालेली नाही. परिणामतः आज पण उडाणपुला खालील गावाकडील रस्ताचे काम अर्धवट आहे लहान मोठी दुकानदार मंडळी यांच्यामुळे त्रस्त आहेत.

कापशी रोड येथे उडाणपुल झाल्याने आमच्या गावातील सर्वच धंद्यावर परिणाम झाला आणि रात्री च्या वेळी उडाणपुलावर व खाली अंधाराचे साम्राज्य असल्याने लवकरच दुकान बंद करावी लागतात त्यामुळे आमचा उदर्वाह कसा भागणार कंपनीच्या वतीने लवकर पथदिवे लावण्यात यावे
संजय केवट ,व्यावसायिक (कापशी रोड)

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल