राजकीय

बार्शीटाकळी अध्यक्षपदी सौ. पुष्पाताई रत्नपारखी यांची तिसऱ्यांदा निवड.

भारतीय जनता पार्टीच्या महिला शहर अध्यक्षपदी सौ. पुष्पाताई रत्नपारखी यांची तिसऱ्यांदा निवड.
बार्शीटाकळी:
स्थानिक भाजपा कार्यकर्त्या व बार्शीटाकळी पोलीस स्टेशन महिला दक्षता समीतीच्या अध्यक्षा तसेच गुरुदेव सेवा मंडळ बार्शीटाकळीच्या महिला प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या सौ.पुष्पाताई हरिदास रत्नपारखी यांना तिसऱ्यांदा बार्शीटाकळी शहर भाजपा महिला आघाडीच्या शहर अध्यक्षपदाचा बहुमान प्राप्त झाला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये तन मन धनाने कार्य केल्याची पावती म्हणून सौ. पुष्पाताई रत्नपारखी यांची तिसऱ्यांदा फेर नियुक्ती झाली. म्हणून शहरवासिया कडून भरभरुन अभिनंदन करण्यात आले आहे. आ.हरीष पिंपळे, खा.सजंयभाऊ धोत्रे ,उपेंद्र कोठेकर,आ.रणधीरभाऊ सावरकर , सौ. सुहासिनीताई धोत्रे ,सौ. नुतनताई पिंपळे यांनी नियुक्तीचे कौतुक केले. खंडारे ताई ,सौ.संगीताताई जाधव , किशोरदादा मागंटे पाटील, अनुपभाऊ धोत्रे , संतोषभाऊ शिवरकार, राजुभाऊ काकड ,संजयभाऊ ईगंळे, अशोकभाऊ राठोड,राठोड काका , प्रवीण धाईत,गोपाल कापकर, ॲड. विनोद राठोड,अनंता केदारे , नागेश ठाकरे,दत्ताभाऊ साबळे आणि उपस्थित सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सदर नियुक्तीच्या शुभेच्छा दिल्या.

आपल्या सामाजीक कार्यातून कर्तुत्वाचा ठसा उमटविणाऱ्या पुष्पा रत्नपारखी यांच्या सारख्या महिलेला तिसऱ्यांदा महिला शहर अध्यक्षपदावर आरूढ करून भारतीय जनता पक्षाने अतिशय योग्य निर्णय घेतला असे म्हटले तर वावगे ठरु नये. कारण सौ. पुष्पा रत्नपारखी ह्या विविध समित्यावर कार्यरत आहेत. पोलीस महिला दक्षता समितीच्या माध्यामातून त्यांनी आतापर्यंत अनेक महिलांना न्याय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.त्या बार्शीटाकळी तालुका गुरुदेव महिला आघाडी प्रमुख सुद्धा आहेत.. एकंदरीतच सामाजीक,सांस्कृतीक व राजकीय अशा तिहेरी क्षेत्रातील त्यांचा वावर , ह्या निवडीने राजकीय पटलावर अत्यंत महत्वाचा ठरेल अशी जनतेत चर्चा आहे.

Advt.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल