आरोग्य विभागस्वच्छता अभीयान

बार्शीटाकळीत ,अस्वच्छ रस्त्यावरून ,स्वच्छता फेरी

बार्शीटाकळीत ,अस्वच्छ रस्त्यावरून ,स्वच्छता फेरी

मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा अभियान

शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

बार्शीटाकळी: ०६ फेब्रुवारी
स्थानिक बाबासाहेब धाबेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढली स्वच्छता फेरी .
आपला परिसर स्वच्छ रहावा ,सर्वाना निकोप व निरोगी आरोग्य लाभावे ह्या हेतूने जगाला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या कार्याला अनुसरून, व मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा ह्या उपक्रमाच्या माध्यमातून, आज दि.०६ फेब्रुवारी २०२४ ,मंगळवार रोजी ,स्थानिक बाबासाहेब धाबेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्सुर्फतेने स्वच्छता प्रबोधन फेरी काढली. या फेरीत एका विद्यार्थ्याने कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची वेशभूषा केली होती. तर ईतर काही गणेशोत्सव व दुर्गोत्सव विसर्जन सोहळा साकारला होता. पारंपारिक वेषभुषेतील विद्यार्थीनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या . तर मुले सुद्धा ह्यात मागे नव्हते.. त्यांनी टाळ मृदंगाच्या तालावर भजन गात गात स्वच्छतेचा संदेश दिला. परंतु दुर्दैवाने आणी नगर पंचायतच्या स्वच्छता विभागाच्या सौजन्याने ह्या स्वच्छता फेरीला अस्वच्छ व खड्डेमय रस्त्यावरून जावे लागले. परिणामी विद्यार्थ्याना नाहकच दुर्गंधी व खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागला . सध्या नगर पंचायतमध्ये प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे कार्यभार आहे. परंतु येथे जबाबदार अधिकारी देत नसल्यामुळे त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विसर पडलेला आहे. शहर वाऱ्यावर सोडले असे म्हटले तर वावगे ठरु नये …
ह्यात एक आशेची बाब म्हणजेच येथे येत असलेले पुर्णकालीन मुख्याधिकारी . त्यांच्याकडुन नागरिकांना आशा आहे.. ते या सर्व निकषावर कितपत खरे उतरतात ते येणारा काळच ठरवेल ..
चौकट
दैनंदिन स्वच्छता केली जाते तसेच रस्त्यावरील कचरा सुद्धा संकलीत केल्या जातो. परंतु घंटागाडी गेल्यानंतर कचरा रस्त्यावर टाकला जातो . म्हणून अस्वच्छता जाणवते. नागरिकांनी कचराकुंडीचा वापर करावा ,दुकानदारांनी आप आपल्या दुकानातील कचरा ,कचरा कुंडीत टाकावा. आणि घंटागाडी आल्यावर त्यांच्याकडे द्यावा .
योगेश तायडे
स्वच्छता अधिकारी
नगर पंचायत ,बार्शीटाकळी

Advt.

 

 

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल