जिल्हा परिषदविशेषशैक्षणिक

जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणाकरिता शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने स्व पातळीवर काम करावे. निलेश घुगे

  • जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणाकरिता शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने स्व पातळीवर काम करावे
    : निलेश घुगे

” अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षणाला राज्य प्रशिक्षक निलेश घुगे यांची भेट ”

अकोला ( दि .२ फेब्रु): अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण अकोला जिल्ह्यातील जि प मनपा आणि खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांकरिता रत्नमाला खडके प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अकोला तथा डॉ. सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली सातही तालुक्यात सुरू आहे. अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षणाच्या सहाव्या टप्प्यामध्ये गोपाल सुरे (प्रशिक्षण समन्वयक तालुका अकोला) यांचे निलेश घुगे (राज्य प्रशिक्षक) सरांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे त्यांच्या खास आग्रहास्तव निलेश घुगे (राज्य प्रशिक्षक) यांनी अकोला तालुक्याच्या सरस्वती इंग्लिश स्कूल केशवनगर अकोला येथील प्रशिक्षण वर्गास स्नेह भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत विश्वंभर आळने (राज्य प्रशिक्षक) ; श्याम राऊत गटशिक्षणाधिकारी अकोला, बालाजी शेळके ज्येष्ठ अधिव्याख्याता डाएट अकोला, गोपाल सुरे प्रशिक्षण समन्वयक, उमेश रेळे राज्य प्रशिक्षक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी निलेश घुगे सरांनी प्रशिक्षणार्थींसोबत संवाद साधताना जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासंबंधी चर्चा केली. प्रशिक्षणामधील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांचे विचार व्यक्त केले. प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थींनी सुरुवातीला संयम ठेवावा. या प्रशिक्षणाचे अद्भुत परिणाम आल्यावर शिक्षकच नाही तर पालक सुद्धा आश्चर्यचकित होतील. ‘काम निम्मे परिणाम दुप्पट आणि आनंद तिप्पट’ ही अनुभूती घेण्यासाठी शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने स्व पातळीवर प्रामाणिकपणे काम सुरू करण्याचे आवाहन केले. अकोला तालुक्याच्या वतीने निलेश घुगे तथा विश्वंभर आळने यांचे स्वागत आणि सत्कार श्याम राऊत गटशिक्षणाधिकारी अकोला आणि बालाजी शेळके यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. गोपाल सुरे प्रशिक्षण समन्वयक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी अर्जुन चौधरी, लीना तायडे, एम.एम. शेहजाद, सोनाली मानकर, विजय वाकोडे, निलेश कवडे,अर्जुन चौधरी आणि विकास राठोड या सुलभाकांसह अकोला बी आर सी येथील सुशांत देशमुख, अनिल महल्ले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन निलेश कवडे यांनी तर आभार प्रदर्शन विकास राठोड यांनी केले.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल