ताज्या घडामोडी

गोवंशास निर्दयपणे वाहून नेताना, एका काऱ्होडीचा मृत्यू

बार्शीटाकळी पोलीसांची नाकाबंदी करून तत्परतेने कारवाई

गोवंशास निर्दयपणे वाहून नेताना, एका काऱ्होडीचा मृत्यू

बार्शीटाकळी पोलीसांची नाकाबंदी करून तत्परतेने कारवाई
बार्शीटाकळी:०१ फेब्रुवारी २४
गोवंशाची निर्दयपणे वाहतूक करतांना एका काऱ्होडीचा मृत्यू.
दि. ०१/०२/२४ रोजी दुपारी १ ते १:३० वाजेच्या दरम्यान गोपनीय माहीती वरून एक टाटा एस (छोटा हत्ती ) क्रमांक. एम एच 04 ए एफ ७२६१ यास पुनोती ता. बार्शीटाकळी बस स्टॉप जवळ नाकाबंदी दरम्यान चेक केले असता ,त्यामध्ये दोन गाय व एक मृत काऱ्होड अतिशय निर्दयपणे कोंबुन कत्तली करीता घेवुन जात असताना मिळुन आले. आरोपी चालक समीसल्लाह खान सगीरल्लाह खान, वय ३३ वर्ष, रा. हालोपुरा बार्शिटाकळी यास ताब्यात घेवुन, त्याचे कहुन दोन गाय व एक मरण पावलेली काऱ्होड आणि वाहन असा एकूण १,९७,०००/- रूपये किम्मतीचा माल जप्त करण्यात येवुन ,त्याचे विरुद कलम ५. ५(अ), (ब), ९ तसेच प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतीबंध अधिनियम कलम ११ सहकलम ४२९ भा.८ वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही हि जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी दाभाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी केली.

Advt.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल