आरोग्य विभाग

आशा स्वंयसेवीकांची पदभरती प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात

आशा स्वंयसेवीकांची पदभरती प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात

निवड समितीसह तीन महिलांवर कारवाहीची मागणी

बार्शिटाकळी:-
स्थानिक नगर पंचायत क्षेत्रात आशा स्वयंसेवकांची निवड शासनाच्या परीपत्रका नुसार झाली नसल्याने ता. २१ ते २७ सप्टेंबर २०२३ या कार्यकाळात घेण्यात आलेल्या, निवड प्रक्रिया मधील उमेदवार अपात्र असुन, निवड झालेल्या तीनही आशा स्वंयसेवीकांची निवड खोट्या व दिशाहिन कागद पत्राच्या आधारे करण्यात आली आहे. त्या कागद पत्रांची चौकशी करून खोटी व दिशाहिन कागद पत्रे सादर करणाऱ्यावर कलम १९३,१९९, व २००, संबधीत कायद्या नुसार कारवाई करून, घेण्यात आलेली निवड प्रक्रिया रद्द करण्याची मागणीसह, चुकीच्या पद्धतीने निवड केलेल्या निवड समितीच्या पाचही अधिकारी ,कर्मचाऱ्यांवर म.ना. से . शिस्त व अपील अधिनियमन १९७९ मधील तरतुदी नुसार कारवाही करण्याची मागणीची तक्रार ,पदवीधर महीला उमेदवार मीनाक्षी संदीप सिरसाठ व वैशाली हेमंत वानखडे रा.अशोक नगर बार्शिटाकळी यांनी ता. २४ जानेवारी २०२४ रोजी जिल्हाधीकारी कार्यालय अकोला, सामान्य प्रशासन विभाग जि.प. अकोला, राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला यांच्या सह संबधीत विभागाकडे केली.आयुक्त कुटूंब कल्याण व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नगर पंचायत क्षेत्रात आशा स्वयंसेविकांच्या पदभरती करीता मुख्य कार्यपालन अधिकारी अकोला यांना पत्राव्दारे निर्देशित करण्यात आले असता, जुलै २०२३ या महीण्यात अर्ज केलेल्या व मुलाखात पत्र देण्यात आलेल्या उमेदवारांची ता. .१२सप्टेबंर २०२३ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कान्हेरी सरप येथे निवड प्रकिया घेण्यात आली. मीनाक्षी सिरसाठ, व वैशाली वानखडे ह्या दोन्ही अर्जदार महीला ११ वाजता वेळेवर मुळ कागद पत्रासह हजर होत्या , तर मुलाखात पत्र देण्यात आलेल्या दुसऱ्या महीला देखील उपस्थीत होत्या, परंतु मुलाखत घेण्याकरीता हजर असलेले अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी-१ वैद्यकिय अधिकारी -२ एच, ए, एल एच व्ही, गटप्रवर्तक असे अधिकारी कर्मचारी ,आशा स्वयंसेवीकांच्या निवड करण्याकरीता हजर होते. शासकिय परिपत्रकानुसार निवड समितीला विधवा महिलांची निवड करायची होती. मात्र तसे झाले नाही, निवड समितीने पदवीधर महिलांचे कोणतेही कागदपत्र न पाहता व सर्व प्रश्नांची अचुक उत्तरे दिल्या नंतर सुद्धा पद निवड गुणात्मक तक्त्या मध्ये पदवीधरांना शुन्यगुण देण्यात आल्याचा निंदनिय प्रकार सदर निवड समितीने केला असुन ,चार पैकी एक महीला उमेदवार अर्चना रविंद्र जामनिक यांची निवड योग्य प्रकारे झाली असुन ,याबाबत आमची काही तक्रार नाही . मात्र ईतर तिन महीलांची निवड प्रक्रिया खोट्या कागद पत्राच्या आधारे जाणीवपुर्वक झालेली असल्याचे सादर केलेल्या कागदपत्रा वरून दिसून येते.कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांची नियम बाहय व मनमानी पणे निवड केल्याचा आरोप वरील दोन पदवीधर महिला उमेदवारांनी केला. निवड समितीने निवडलेल्या तिनही महिलांची निवड देवान घेवान करीत खोट्या कागदपत्राच्या आधारे केली आहे. त्यांची निवड रद्द करण्यात यावी, अशा प्रकारची तक्रार संबधीत विभागा कडे करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा तक्रारकर्ता महिलांनी दिला.

चौकट
स्वयंसेवीका निवड प्रक्रियेची चौकशी करण्यात आली असुन हि प्रक्रिया रितसर राबविण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते . याची चौकशी सुद्धा करण्यात आली आहे. तर सर्वांन समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येते, स्थानिक रहवासीचा मुद्दा होता. तो सुद्धा निकाली काढला आहे. त्या मुळे कोणावर अन्याय झालेला नाही असे माझे मत आहे. खरोखरच अन्याय झाला असेल तर M,O.वर कारवाही करीत प्रक्रिया खंडीत करण्यात येईल.
डॉ.सुधीर कराळे ,तालुका आरोग्य अधिकारी बार्शिटाकळी

Advt.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल