अमृत महोत्सवप्रशासकीयविशेष

बार्शीटाकळीमध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा

बार्शीटाकळीमध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा
बार्शीटाकळी:
बार्शीटाकळी शहरात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आज दि.२६ जानेवारी २०२४ रोजी बार्शीटाकळी शहरातील विविध शासकिय कार्यालयात तथा सामाजिक व राजकीय मंडळीनी मोठ्या उत्साहाने ७५ वा प्रजासत्ताकदिन साजरा केला.यामध्ये नगर पंचायतला मुख्याधिकारी विजय लोहकरे ,पोलीस स्टेशन बार्शीटाकळी येथे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्याहस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरीक व सामाजीक कार्यकर्ते नरेंद्र पोटेकर यांची उपस्थिती होती . तदनंतर सकाळी ९ :१५ मिनिटांनी, स्थानिक तहसील कार्यालयात तहसिलदार दीपक बाजड यांच्याहस्ते झेंडावंदन करण्यात आले .. यावेळी पोलीस उपनिरिक्षक निलेश तारक व त्यांच्या सहकाऱ्यांनी मानवंदना दिली.
.यावेळी प्रमुख उपस्थितीत माजी आमदार ज्ञानदेवराव ठाकरे, निवासी नायब तहसीलदार श्रीमती हर्षदा काकड, महसूल ना.त.आर .बी .डाबेराव, निवडणूक ना.त. विनोद पाचपोहे,सं.गां.यो.ना.त.श्री.माञे.सर्व अव्वल कारकून, महसूल सहायक, मंडळ अधिकारी, तलाठी, शिपाई, कोतवाल,वाहन चालक .माहोकार, बार्शीटाकळी तालुक्यातील सर्व गणमान्य नागरिक, पत्रकार बांधव, पोलिस कर्मचारी, शालेय विद्यार्थी विद्यार्थीनी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.सुञसंचालन श्रीमती निलुताई सराटे यांनी केले.उत्कृष्ट रांगोळी सुनिता डुकरे व दिपाली रिसोडकर या कोतवाल भगिनीनी रेखाटली.कार्य…यशस्वीतेसाठी सुरेश हिवराळे, संतोष व्यवहारे, कैलास शेळके, अनिल चहाकर यांनी परीश्रम घेतले.नायब नाझर अमोल बेलखेडे यांच्या नियोजनात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सोहळा मोठ्या हर्ष उत्साहात पार पडला.


  1. चौकट
    एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून भारताच्या स्थापनेचे प्रतिनिधित्व करतो . हे संविधानात अंतर्भूत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांवर भर देते.
    भारत २६ जानेवारी, शुक्रवारी आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन (गणतंत्र दिवस) साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. दरवर्षी, देशातील नागरिक हा दिवस भव्यतेने आणि उत्साहाने साजरा करतात. या उत्सवांमध्ये नेत्रदीपक लष्करी आणि सांस्कृतिक स्पर्धा आहे.
    भारत १५ ऑगस्ट १९४७ ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि २६ जानेवारी १९५० आपली राज्यघटना अंमलात आली. म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक झाला. याच राज्यघटनेनुसार आजही आपलं सरकार, आपली राज्यव्यवस्था आणि एकूणच राज्यकारभार चालतो.

 

Advt.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल