क्राईमसामाजिक

बार्शीटाकळी तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याबाबत ठाणेदारांना निवेदन

वंचित बहुजन युवक आघाडी अवैध धंद्याविरुद्ध आक्रमक

बार्शीटाकळी तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याबाबत,वंचित बहुजन युवक आघाडीचे  ठाणेदारांना निवेदन

बार्शीटाकळी:दि.२३ जानेवारी २०२४
बार्शीटाकळी तालुक्यातील विविध प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याबद्दल वंचितचे निवेदन.
सविस्तर वृत्त असे की बार्शीटाकळी तालुक्यातील ,बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात विविध प्रकारच्या अवैध धंद्याना ऊत आल्याचे वंचितने आपल्या निवेदनात म्हटले आहे.. ते लिहतात की बार्शीटाकळी तालुक्यातील बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गांवामध्ये, देशी-विदेशी, गावरान दारु, झन्ना-मन्ना, पत्ता व पत्त्यांचे डाव, ऑनलाईन मटका, कल्याण-मुंबई- वरळी मटका पेट्रोल गुटखा पुडी गांजा अवैध उत्खनन,रेशनच्या तांदुळाची काळा बाजारात विक्री या सारखे अवैध धंदे सुरु आहेत. सदर अवैद्य धंद्यामुळे गावागावातील लहानथोर व तरुण व्यसनाधिन झालेला आहे. घराघरात भांडण तक्रार होत असुन महिलांचे संसार उध्दवस्त होत आहेत. या विषयी अवैद्यधंदे करणाऱ्या, धंदेवाल्याना समजाविण्यास गेल्यास त्यांच्याकडून सर्वसामान्य जनतेत दहशत पसरविली जाते . पोलिस आमचे काही करु शकत नसल्याचे सांगुन ,ते जनतेला परेशान करीत आहेत. करिता बार्शीटाकळी तालुक्यातील बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील अवैद्य धंदे बंद करण्यात येऊन, तालुक्यात कायद्याचे राज्य निर्माण करून ,सर्वसामान्य जनतेस न्याय देण्यात यावा ही नम्र विनंती ,वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतिने करण्यात आली आहे.अवैद्य धंदे बंद न झाल्यास वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. यादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास शासन जबाबदार राहील.यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका प्रमुख अमोल जामनिक ,रक्षक जाधव ,सनि धुरंधर,राजकुमार खडे ,विकि डोंगरे ,सचिन गोपनारायण ,अक्षय सरकटे ,अरुण कांबळे,संघर्ष खडे ,सिद्धार्थ जामनिक ,जय खडे ,सुरज इंगळे ,श्रीकृष्ण देवकुणबी ,छाया जाधव ,कामीनाबाई राठोड,ज्योती जाधव ,केसरबाई चव्हाण,योगेश भगत ,रोहिदास खाडे ,अजय गोपनारायण ईत्यादि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित असल्याचे समजते .

 

चौकट

बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्याची रेलचेल वाढली आहे. त्यामध्ये वरली मटका ,तितली भवरा ,अंदर बाहर ,रेशनच्या तांदळाची काळा बाजारात विक्री ,गुटखा विक्री ,हातभट्टी व देशी दारूची अवैधरित्या विक्री ,गोवंश कत्तल या प्रकारचे सर्व अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतिने तीव्र आंदोलन छेडण्यात येइल..

अमोल काशीराम जामनिक

तालुकाध्यक्ष ,वंचित बहुजन युवा आघाडी

 

जाहिरात….

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल