आरोग्य विभाग

अकोल्यातील औषधी बाजारातील ,दोन घाऊक औषधी दुकाने बंद

 

अकोल्यातील औषधी बाजारातील ,दोन घाऊक औषधी दुकाने बंद
अन्न औषधी प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई

अकोला, दि. १९ (प्रतिनिधी)
स्थानिक दवा बाजारातील काही औषधी दुकानांच्या विना लायसन्स जागेत औषधी साठा ठेवल्या जात असून गर्भपाताच्या किट, झोपेच्या गोळ्या, कोडिन सायरप सर्रास विक्री होत असल्याच्या तक्रारी प्रकरणी अखेर दी अशोक फार्मा, आणि भारतीय एजन्सीचे दुकान बंद झाले आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत ही बंदची कारवाई राहणार आहे. याप्रकारामुळे औषधी बाजारात खळबळ माजली आहे.
सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख यांच्या दिनांक २ जून २३ रोजीच्या तक्रारीवरून ,अन्न औषधी प्रशासनाने ९ जून २३ रोजी कारवाई केली होती. दवाबाजारात निवडणूक असल्याने वातावरण तापले होते. दरम्यान शेकडो पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडे धाव घेवून एक दिवस औषधी बाजार बंद ठेवला होता. त्यानंतर उशिरा का होईना ऑक्टोंबर 23 मध्ये औषधी बाजारातील ,चार औषधी एजन्सी एक महिन्यासाठी निलंबित झाल्यात. त्यामध्ये व्होरा एजेन्सी, दी अशोक फार्मा, में भरतीया एजेन्सी आणि श्री. डिस्ट्रीब्यर्टस या चार पेढयांचा समावेश होता. या चारही एजन्सींना नोटीस बजावून ३० दिवसाकरीता निलंबीत करण्यात आले होते. दरम्यान यातील दोन एजन्सीने न्यायालयातून स्टे मिळविला. मात्र ईतर दोन एजन्सीला स्टे न मिळाल्याने त्यांना आता पुढील आदेशापर्यंत दुकान बंद ठेवावे लागत आहे.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल