क्राईम

सैन्य दलाच्या नावाचा वापर करून जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न

औषधी विक्रेत्यांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे संघटनेचे आवाहन

सैन्य दलाच्या नावाचा वापर करून जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न

औषधी विक्रेत्यांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे संघटनेचे आवाहन

श्याम ठक
बार्शीटाकळी:
मागील कित्येक दिवसांपासून अज्ञात व्यक्ती स्वतःला सैन्य दलाचा अधिकारी सांगत फोन कॉल आणी व्हाट्सअँप द्वारे औषधी पाहिजेत म्हणून औषधी विक्रेत्यांना बोलून त्यांना व्हाट्सएप्प वर यादी टाकत पेमेंट करण्याच्या नावावर ,क्रेडिट किंवा डेबिट कार्ड व फोन पे ,गुगल पेची काही गोपनीय माहिती विचारून लुबाडण्याचे काम करत होता .अकोला जिल्हा केमिस्ट & ड्रगिस्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दि.१९ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांना पूर्ण प्रकरणाची माहिती दिली.व त्यांनी लगेच विषयाची गंभीरता समजत तात्काळ स्थानीय गुन्हे शाखेला प्रकरण सुपूर्द करून चौकशीचे आदेश दिले.गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके साहेब यांनी तात्काळ कामाला सुरुवात करत चौकशी सुरु केली .पदाधिकाऱ्यां समक्षच त्यांनी सायबर सेलची मदत घेऊन लोकेशन घेतले. त्यातून असे निष्पन्न झाले कि सदर कॉल्स करणारी टोळी हि उत्तर प्रदेशच्या जंगलातून सक्रिय आहे.साहेबांनी कार्यवाही करण्याची हमी देत सांगितले कि संबंधित नंबरला तात्काळ ब्लॉक करण्याचे निर्देश सर्व औषधी विक्रेत्यांना द्या .

चौकट
प्रामुख्याने संघटना आपल्याला सांगू इच्छिते कि
कोणत्याच आमिषाला बळी पडू नका
कुठलीही ऑर्डर किंवा चिट्ठी हि व्हाट्सएप्पला आल्यावर शहानिशा केल्या खेरीज महत्व देऊ नका.
गोपनीय माहिती जसे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड व यु पीआय संबंधित कुठलीही माहिती देऊ नका.
कोणी तुम्हाला पेमेंट केल्याचा स्क्रीन शॉट दाखवत जास्तीचे पेमेंट झाले म्हणून परत करा म्हटल्यावर आधी आपल्या खात्यामध्ये सदर रक्कम आली आहे का ती तपासा त्या नंतरच दखल घ्या.
अनोळखी नंबर वरून आलेला विडिओ कॉल रिसिव्ह करू नका त्या द्वारे सुद्धा फसवणूक होऊ शकते.
कृपया करून सदर बाबींचे गांभीर्याने पालन करा
चंद्रकांत शर्मा
सचिव
अकोला जिल्हा केमिस्ट & ड्रगिस्ट संघटना

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल