ताज्या घडामोडी

मी अयोध्यीतेल कार्यक्रमात उपस्थित राहणार नाही- ॲड.बाळासाहेब आंबेडकर

प्रिय श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्ट – अयोध्या,
श्री रामजन्मभूमी अयोध्या प्राण-प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पत्रिका
अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी मंदिराच्या अभिषेकासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद.
या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार नाही. मी उपस्थित न राहण्याचे कारण म्हणजे भाजप आणि आरएसएसने हा कार्यक्रम हायजॅक केला आहे. धार्मिक सोहळा हा निवडणुकीच्या फायद्यासाठी राजकीय प्रचार बनला आहे.
माझे आजोबा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला होता की “राजकीय पक्षांनी धर्म, पंथ देशाच्या वर ठेवला तर आमचे स्वातंत्र्य दुसर्‍यांदा धोक्यात येईल आणि या वेळी कदाचित आम्ही ते कायमचे गमावू.” आज ही भीती खरी ठरली आहे. धर्म आणि पंथाला देशापेक्षा वरचे स्थान देणाऱ्या भाजप-आरएसएसने आपल्या राजकीय फायद्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे.
धन्यवाद.
जय फुले. जय सावित्री. जय शाहू. जय भीम.

 

जाहिरात..

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल