उत्सवसामाजिकस्वच्छता अभीयान

द ग्रेट मराठा मंडळाकडून श्रीराम मंदिर परिसराची

द ग्रेट मराठा मंडळाकडून श्रीराम मंदिर परिसराची साफसफाई
श्याम ठक
बार्शीटाकळी:
स्थानिक व पुरातन अशा श्रीराम मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली..
तरुणाई म्हटल्यावर आजकाल ते जास्तीतजास्त सोशल माध्यमावर व्यस्त असल्याचे बोलले जाते .. परंतु याला अपवाद ठरतात ते बार्शीटाकळी येथील द ग्रेट मराठा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते …त्याला कारणही तसेच आहे.. देशभरात २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होणाऱ्या रामजन्मभूमी स्थानावर भव्य मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने देशभरातील लहानमोठ्या मंदिराची साफसफाई करण्यात यावी अशे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ,काळाराम मंदिर नाशिक येथे केले होते. त्या आवाहनाचा धागा पकडून नेहमीच विविध व कल्पक उपक्रम राबवून समाजोपयोगी कार्य करणाऱ्या द ग्रेट मराठा मंडळ बार्शीटाकळी यांनी स्थानिक श्रीराम मंदिर परिसराची साफसफाई केली.. ह्या मंदिरात येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.या साफसफाई अभियानात द ग्रेट मराठा मंडळ प्रमुख निखिल रत्नपारखी व त्याचे सहकारी सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने क्रिष्णा पिंजरकर ,ओम धाईत ,सार्थक रत्नपारखी,प्रथमेश कापकर ,मयुर अग्रवाल,चेतन देवगिरीकर ,सोहम मुर्तळकर ,दादू धवने ,यश कवळकर ,अभिषेक आरेकर ,प्रेम करपे ,महेश कापकर ,दक्ष बोबडे,दादू चव्हाण,अर्जुन कोंडावार ,रिषिकेश करपे ,अर्पित शिंदे ,वेदांत करांगळे ,निखिल करपे ,देवानंद सोंगे व गणेश करपे यांचा समावेश होता.

 

चौकट
यापूर्वी द ग्रेट मराठा मंडळाने पोळ्याच्या दिवशी गल्लोगल्ली फीरुन राख्या गोळा केल्या होत्या. दरवर्षी स्वातंत्र्यदिवस व गणराज्य दिवशी रस्त्यावर पडलेले कागदी व प्लॅस्टिक ध्वज उचलून त्याचा सन्मान कायम राखण्याचे बहुमोल कार्य केले आहे. शहरातील युवकांसाठी खेळाचे मैदान ,गणेशोत्सव काळात निर्माल्या संकलीत करणे अशाप्रकारचे विविध कार्य सुरु असते.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल