उत्सवविशेषसामाजिक

संक्राती निमित्त .. तिने पुन्हा ते अंगिकारावे जुनेच वान द्यावे -घ्यावे प्रा.डॉ.प्रियंका मसतकर – वांदिले

तिने पुन्हा ते अंगिकारावे
जुनेच वान द्यावे -घ्यावे
प्रा.डॉ.प्रियंका मसतकर – वांदिले
अकोला:
संक्रांतीचा सण आला की बायकांची लगबग सुरू होते, हळदी कुंकू, वाण… हळदी कुंकू आणि प्लास्टिकचा छोट्या छोट्या स्टिलच्या वस्तूचा कचरा घरात साचून साचून नको होईल.

पूर्वी सवाशीन स्त्रीची ओटी भरून वाण द्यायची पद्धत होती जी की सर्वस्वी इको फ्रेंडली होती ..

आता हेच पहा ..मार्केट मध्ये बनावटीच्या स्वस्तात मस्त अश्या वस्तूंना उधाण येईल आणि हजारोंनी सवाशीणी, त्या वस्तू खरेदी करतील..देवाण घेवाण होईल ..अश्या वस्तू 90% वस्तू या प्लास्टिकच्या ..त्यामुळे त्या वस्तूंचा उपयोग न होता ..फक्त कचरा जमा होईल ..म्हणजेच करोडो टन प्लास्टिक चा कचरा हळदी कुंकू च्या नावाखाली पर्यावरणात येईल आणि पर्यावरण दुषित होण्यत भर पडेल ज्याचा ह्रास, विघटन वर्षानुवर्षे होणार नाही..म्हणून…

सर्वच स्त्रियांना कळकळीची विनंती आहे ..आपण पर्यावरण पूरक हळदी कुंकू करूयात ..आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना ..सुख समृध्दी च वाण देऊया..त्यासाठी खूपच सुज्ञ वाण खरेदि करावी लागेल ते म्हणजे रोपटे देवुन आणि त्याचे स़गोपण करून पर्यावरण पूरक हळदी कुंकू करूया. ज्यांचा आपल्याला उपयोग पण होतो आणि पर्यावरण जोपासण्यास मदत करू शकाल.
स्वस्त वस्तूंच्या लोभात न पडता पर्यावरण जोपासण्यास मदत करूया.इतकं मन आपण मोठं ठेऊच शकतो..जेणे करून आपण किमान आप आपल्या एरिया पासन सूरवात केली आणि हा संकल्प घेतला तरी
बराच फरक पडू शकतो ..
या वर्षी नवीन काही तरी करून आपल्या पुढच्या पिढीसाठी आदर्श ठेऊयात

चला तर मग या वर्षी नैसर्गिक ओटी भरुया….
प्रा .डॉ .प्रियंका मसतकर वांदिले वनस्पतीशास्त्र विभाग, गुलाब नबी आझाद महाविद्यालय बार्शीटाकळी जि.अकोला अकोला.९५६१८०९४३२

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल