क्राईमग्रामीण वार्ताताज्या घडामोडी

बार्शीटाकळी तालुक्यातील अवघ्या ४ महिन्याच्या बालीकेचे अपहरण

अवघ्या ४ महिन्याच्या बालीकेचे अपहरण

बार्शीटाकळी तालुक्यातील निंबी – चेलका येथील
,रात्री १ वाजेच्या सुमारास घडलेली घटना

बार्शीटाकळी:दि.११ जानेवारी २०२४
तालुक्यातील निंबी -चेलका येथील अवघ्या ४ महिन्याच्या बालीकेचे अपहरण झाल्याची तक्रार बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की निंबी -चेलका तालुका बार्शीटाकळी येथील कु.ईश्वरी बाबाराव करवते ह्या अवघ्या ४ महिन्याच्या बालीकेचे अपहरण झाल्याची तक्रार बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला अपहृत बालीकेचे वडील बाबाराव सिध्दार्थ करवते यांनी दिली आहे. सौ. कोमल बाबाराव करवते (अपहृत बालीकेची आई ) ,रोशन वय ५ वर्ष,चि.रौनक वय ४ वर्ष व कु.ईश्वरी वय ४ महिने लेकरांसह झोपली होती. दि.१@ जानेवारी २०२४ च्या मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास आई सौ. कोमलला , घराच्या कंपाउंडच्या ताडपत्रीचा आवाज ऐकायला आला म्हणून ती झोपेतून जागी झाली. डोळे उघडून बघितले तर बाजुला झोपलेली ईश्वरी दिसली नाही. म्हणून तीने ह्याबाबत आपल्या पतीला सांगितले . तिच्या पतिने ,नातेवाईकांना सोबत घेऊन आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता कु. ईश्वरी मिळून आली नाही. सदर बालीकेला अज्ञात ईसमाने उचलून नेल्याची जाणीव झाली. व ह्या घटनेची तक्रार आज दि.११ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ,बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला दिली.बार्शीटाकळी पोलीसांनी अज्ञात ईसमाच्या विरूध्द अप.क्रमांक ६६/२०२४ नुसार ३६३ कलमानन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीटाकळी पोलीस तपास करत आहेत. याकामी तपास पथके गठीत करून अपहृत बालीकेचा शोध घेण्याचे कामी रवाना केल्याचे समजते.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल