आरोग्य विभागकोरोना अपडेटताज्या घडामोडी

बार्शीटाकळी येथील एक रुग्ण कोरोना बाधित

बाळकृष्ण उताणे ,प्रतिनिधी

बार्शीटाकळी येथील एक रुग्ण कोरोना बाधित

बार्शीटाकळी:
अकोला जिल्ह्यात दि. 27 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान
87 आरटीपीसीआर व 1 हजार 663 अशा एकूण 1 हजार 750 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यात आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तसेच डॉ. हेडगेवार प्रयोगशाळा येथे आज 9 आरटीपीसीआर व जिल्ह्यात एकूण 114 रॅपीड टेस्ट करण्यात आल्या. त्यात एक कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला. हा रूग्ण बार्शीटाकळी तालुक्यातील असून, खासगी रूग्णालयात उपचार घेत आहे. यापूर्वी आढळलेले चार रूग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. त्यानुसार सध्या जिल्ह्यात सक्रिय रूग्णांची संख्या 5 इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने दिली.

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, जोखमीच्या व्यक्तींनी गर्दीत न जाणे, कुठलीही सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी झाल्यास त्वरित नजिकच्या संस्थेत तपासणी करून घेणे आदी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल