उत्सवविशेषशैक्षणिकसत्कारमूर्ती

यशदाच्या राज्यस्तरीय ट्रेनर सौ.प्रतिभा काटे यांना ‘सावित्रीची लेक’ पुरस्कार प्रदान

यशदाच्या राज्यस्तरीय ट्रेनर सौ.प्रतिभा काटे यांना सावित्रीची लेक पुरस्कार प्रदान
बार्शीटाकळी:
अकोला येथील सामाजिक कार्यकर्त्या महाराष्ट्र शासनाच्या यशदा, पुणे राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर सौ. प्रतिभाताई गजानन काटे ह्या , गेली 35 वर्षापासून सामाजिक कार्य करीत असून ,महा एनजीओ फेडरेशन पुणे यांनी अकोला जिल्हा समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे .त्या तळागाळातील मागासवर्गीय शिक्षण घेत असलेल्या मुलींचे व काम करणाऱ्या स्त्रियांचे आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उत्थानासाठी अविरतपणे कार्य करीत आहेत अशा या कार्यामध्ये त्या यशस्वी झाल्या आहेत.या उत्कृष्ट सामाजिक कार्याची नोंद व दखल घेऊन त्यांना नुकतेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा अकोलाच्या वतीने “सावित्रीची लेक” गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल