विशेषशैक्षणिक

बार्शीटाकळी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात अंतरीक्ष महायात्रा प्रदर्शनीचे आयोजन

बाबासाहेब धाबेकर विद्यालयात अंतरीक्ष महायात्रा प्रदर्शनीचे आयोजन

बार्शीटाकळी:
दि.०२ जानेवारी २०२४  रोजी स्थानिक बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे इस्रो(भारतीय अंतराळ संस्था)शिक्षण विभाग व बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने योजीत अंतरिक्ष महायात्रा प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत स्पेस ऑन व्हील ही बस विद्यालयात दाखल झाली होती. यावेळी इस्त्रोचा आजपर्यंतचा प्रवास यामध्ये दाखवण्यात आला होता. या उपक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य गजेंद्र काळे व विज्ञान मंडळाचे विभागीय अध्यक्ष रवींद्र भास्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विज्ञान तालुका अध्यक्ष प्रभू चव्हाण, तालुका समन्वयक साहेबराव शिंदे,केंद्रप्रमुख शफिक खान, उपमुख्याध्यापक तौकिर खान,पर्यवेक्षक सय्यद नासिर जमाल तसेच तंत्रज्ञ सुजित चव्हाण मो . आसिम,मिलिंद सोनबले यांची उपस्थिती होती. यावेळी इस्त्रोच्या कामगिरीवर आधारित रांगोळी स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी कमरुज्जमा, सय्यद नाशिद  अली, सय्यद शकील, राहुल खांबलकर,संतोष राठोड, तारेक शेख, रक्षा जाधव,सौ.पुजा धाबेकर ,मेघा कावल, सोनाली पाटील, यांनी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल कडू यांनी तर आभारप्रदर्शन साहेबराव शिंदे यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिस खान, गजानन जाधव, वकार खान, मोबिन सर, अतीक पठाण, सय्यद मुत्तजिर जमाल,अझहर खान, गोपाल करणकार विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल