जिल्हामहाराष्ट्रविशेष

हिट & रनच्या कायद्या विरोधात बार्शीटाकळी येथील वाहन चालकांचे राष्ट्रपतींना साकडे

हिट & रन कायद्या विरोधात, बार्शीटाकळी येथील वाहन चालकांचे राष्ट्रपतींना साकडे

बार्शीटाकळी:
केंद्र शासनाच्या नव्यानेच तयार झालेल्या हिट & रन कायदा रद्द करण्यात यावा याकरिता तहसीलदार यांच्याकडे निवेदन.
देशभरात ट्रक चालकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन पुकारलं. ‘हिट अँड रन’ कायद्यात केंद्र सरकारनं काही कठोर तरतुदी केल्या आहेत. त्या विरोधात सर्वत्र ट्रक चालकांमध्ये संतापाची लाट आहे. या कायद्या विरोधात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशासह अनेक राज्यांत आंदोलन सुरू आहे. या आंदोलन आधी शांततेत सुरु होतं. मात्र, चालक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर याला हिंसक वळण लागलं. तर दुसरीकडे या आंदोलनामुळं दैनंदिन वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली.याच अनुषंगाने बार्शीटाकळी येथील वाहन चालक यांनी एकत्रित येवून आज दि.०२ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रपती यांच्याकडे बार्शीटाकळी तहसीलदार यांच्या मार्फत नव्यानेच तयार झालेला हिट ॲन्ड रन कायदा रद्द करण्याबद्दल निवेदन देण्यात आले .
ह्या वाहन चालकांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की सदर कायद्यातील तरतुदीमुळे अनेक सर्व सामान्य गोर गरीब वाहन चालकांचा कायदा जीव घेणारा ठरणार आहे. कारण तुटपुंज्या पगारावर सर्वसामान्य वाहन चालक काम करतात. जर ते अनावधानाने हिट ॲन्ड अण केस मध्ये दोषी ठरले त्र त्यांना १० वर्षाची शिक्षा व ७ लाख रुपयाचा दंड सुद्धा होवु शकतो.. यामुळे गोरगरीब ड्रायव्हरांचे कुटुंब उघड्यावर येण्याचा धोका नाकारता येत नाही…म्हणून महामहिम राष्ट्रपती यांनी सर्व गोरगरीब वाहन चालकांच्या निवेदनाचा विचार करावा अशी विनंती केलेली आहे. सदर निवेदन देतांना तालुका अध्यक्ष शेख मुंतजिर ,निसार खान ,अब्दुल अन्सार ,
इरफान खान यांच्यासह बहुसंख्येने वाहनचालक उपस्थित होते.

चौकट
पहिल्या तरतुदी काय होत्या :अपघात झाल्यानंतर वाहनचालकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (कलम 279) प्रमाणे निष्काळजीपणे वाहन चालवणं, (304 अ) म्हणजेच निष्काळजीपणामुळं मृत्यू आणि 338 नुसार जीव धोक्यात घालणं या कलमांखाली गुन्हा दाखल केला जात होता. मात्र, नवीन कायद्यात घटनास्थळावरून पळून गेलेल्या चालकावर कलम (104(2))अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जर त्यानं पोलिसांना किंवा दंडाधिकार्‍यांना माहिती दिली नाही, तर त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि दंडही भरावा लागणार आहे.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल