क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताजिल्हा परिषदविशेषशैक्षणिक

परंडा आश्रम शाळेचे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत घवघवीत यश

परंडा आश्रम शाळेचे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत घवघवीत यश
बार्शीटाकळी:
५१वी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी बार्शीटाकळी पंचायत समिती अंतर्गत शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजंदा येथे दि. २८ व २९ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न झाली.
ह्या प्रदर्शनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्य. आश्रम शाळेचे, प्राथमिक गटातील मॉडेल तालुका स्तरसाठी निवडण्यात आले आहे. कु.दिशा नंदू बगळे इयत्ता सातवी हिने , शिक्षक विजय रामदास चतुरकार यांच्या मार्गदर्शनाखाली फॉग क्लिअर यंत्र बनविले. या मॉडेलचे महत्व निरीक्षकांना अतिशय योग्य वाटले .तसेच सर्व परीक्षकांनी सुद्धा या मॉडेलची निवड केली. मागील वर्षी सुद्धा या ह्याच शिक्षकांचे मॉडेल राज्य स्तरावर निवडल्या गेले होते . या सोबतच प्राथमिक गटाची दिव्यांग विद्यार्थीनी कु. श्रेया कोरडे, माध्यमिक गटातील कुणाल नंदू बगळे व आदर्श वानखडे यांच्या मॉडेलची सुद्धा तालुका स्तरावर निवड करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बोथे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्वत्र मार्गदर्शक शिक्षक विजय चतुरकर व त्यांच्या यशस्वी विद्यार्थ्यांवर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल