ताज्या घडामोडीवन विभागविशेषसामाजिक

बार्शीटाकळी तालुक्यातील एकमेव सर्पमित्र “विक्की उमाळे”ची पुन्हा धाडसी कार्यवाही ,दोन अजगर पकडले

बार्शीटाकळी तालुक्यातील एकमेव सर्पमित्र “विक्की उमाळे”ची पुन्हा धाडसी कार्यवाही

यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात एक भलामोठा साप पकडून भयमुक्त केले होते .आणि ०६ नोव्हेंबरच्या रात्री सुद्धा ,भल्यामोठ्या घोणस सापाला पकडून नागरिकांना भयमुक्त केले होते .आज ब्राम्हणदरी येथे दोन अजगर पकडले.

श्याम ठक
बार्शीटाकळी:
तालुक्यातील एकमेव असलेल्या सर्पमित्राने बार्शीटाकळी तालुक्यातील ब्राम्हणदरी येथे दोन अजगर पकडून नागरिकांना भयमुक्त केले .
बार्शीटाकळी शहरापासून ५ते ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्राम्हणदरी येथे आज दि.१६ डिसेंबर २०२३ रोजी ,आळंदा( रुस्तमाबाद ) ता. बार्शीटाकळी येथील सर्पमित्र विक्की उमाळे ह्याने मोठ्या कौशल्याने व हिम्मतीने दोन अजगर पकडून ,नागरिकांना भयमुक्त केले. ह्या दोन अजगरापैकी एक १० फूट लांब तर दुसरा ८ फुट लांबीचा होता. दोन्ही अजगरांना वन्यजीव विभागाला कळवून,जंगलात सुरक्षित सोडून देण्यात आले. त्याच्या ह्या धाडसी कारवाईचे सर्वत्रच कौतुक होत आहे.

चौकट
ज्याच्याशी मैत्री कराल त्याचा मित्र म्हणवल्या जाल…!!
सर्पमित्र होण्या साठी अजून तरी कोणत्याही प्रकारचा सरकारी, निमसरकारी, किंवा खाजगी कोर्स तयार झालेला नाही.
या साठी आपणच आपल्याला त्या क्वालिटीचे बनवावं लागतं. सर्वप्रथम आपल्याला सर्प पकडता यायला हवा. मग तो कोणत्याही जातीचा असेल तरीही .सर्वच विपरीत परिस्थितीत कोणालाही आणि स्वतःला देखील काहीही इजा न पोहचविता आपल्याला जर साप पकडणे जमलं तर समजावं आपण सर्प मित्र म्हणवल्या जाणारी परिक्षा पास झालो.बार्शीटाकळी तालुक्यातील मी एकमेव सर्पमित्र असल्यामुळे बरेचदा कॉल आल्यावर पोचायला शक्य होत नाही. म्हणून जास्तीतजास्त सर्पमित्र तयार करणे सुरु केले आहे.
विक्की उमाळे
सर्पमित्र
आळंदा ता. बार्शीटाकळी जि.अकोला
मोबाईल नंबर
9545991289

 

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल