जिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमहाराष्ट्रविशेषसामाजिक

पारस औष्णिक विज निर्मिती केंद्रात तिसऱ्या संचासाठी आ. नितीन देशमुख यांचा पुढाकार

स्वप्नील इंगळे - तालुका प्रतिनिधी - बाळापूर

पारस औष्णिक विज निर्मिती केंद्रात तिसऱ्या संचासाठी आ. नितीन देशमुख यांचा पुढाकार

स्वप्नील इंगळे ( बाळापूर ता. प्रतिनिधी)
पारस:
पारस औष्णिक विस्तारीकरण संच क्रमांक तीन करीता, आ.नितीन देशमुख यांनी पुढाकार घेऊन ,व्यवस्थापकीय संचालक निर्मिती, यांचे सोबत सविस्तर चर्चा केली .पारस येथील शेतकऱ्यांची जमीन ही ,औष्णिक वीज प्रकल्पाकरिता संपादित केलेली आहे .त्याकरिता त्या जागेचा उपयोग फक्त औष्णिक वीज प्रकल्पाकरिताच व्हावा अशी एकमुखी मागणी, ,आ.नितीन देशमुख यांनी व्यवस्थापकीय संचालक यांचे समोर लावून धरली .

औष्णिक वीज प्रकल्प येणाऱ्या बाबी पूर्ण करण्याकरता आम्ही आपणास मदत करू अशी ग्वाही आ.नितीन देशमुख यांनी दिली. या शिष्टमंडळासोबत प्रकल्पग्रस्त कृती समिती व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या चर्चेतून सकारात्मक निर्णय निघेल अशी आशा दिसल्याची चर्चा कानावर आली . प्रकल्पग्रस्तांच्या शेती घेताना , जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकारी यांच्या अंतिम निवाळ्यात ,औष्णिक वीज प्रकल्पाबाबत उल्लेख केलेला आहे .ही सदरची शेती औष्णिक वीज प्रकलाकरिता संपादित करत असल्याचे म्हटले .तसेच शेतकऱ्या जवळून कंपनीने करारनामा लिहून घेताना ,या जागेवर 660m चा प्रकल्प उभारल्या जाईल असे आश्वासित केले आहे .या परिसरातील बेरोजगारांसाठी,रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याकरिता ,पारस येथे सौरऊर्जा प्रकल्पाची गरज नाही . तर ती गरज आहे औष्णिक वीज प्रकल्पाच्या विस्तारीकरणाची .अकोला जिल्ह्यातील रोजगार निर्मिती करून देणारा प्रकल्प म्हणून या उद्योगाकडे पाहिले जाते. अकोल्या जिल्ह्यातच नव्हे तर वाशिम ,बुलढाणा आणि अमरावती ह्या शेजारील तिन्ही जिल्ह्यात इतका मोठा उद्योग निर्माण झालेला नाही. त्या कारणामुळे आपल्या परिसरातील बेरोजगार हे नाशिक, छत्रपती संभाजीनगर पुणे व मुंबई सारख्या ठिकाणी रोजगार करिता भटकंती करतात . पारस येथे दहा हजार सहाशे वीस कोटीचा प्रकल्प रद्द करून तो इतर ठिकाणी हलवण्यात आला. त्या कारणामुळे या परिसरावर बेरोजगारीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. म्हणूनच सौरऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी ,प्रकल्पग्रस्त कृती समिती व गावकरी मंडळी यांच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभारण्याची दिशा निश्चित करण्यात येत आहे .तेव्हा या आंदोलनात सर्वांनी पक्षभेद विसरून सामील व्हावे .या उद्योगामुळे बाळापुर तालुक्यातील व या पंचक्रोशीतील बेरोजगारांना कामाची संधी उपलब्ध होईल .या प्रकल्पाकरिता पाणी कमी असल्याची चुकीची माहिती ,काही विशिष्ट अधिकारी यांनी शासन दरबारी पुरवल्याचे जाणवते. तेव्हा पाण्याच्या बाबतीत पुन्हा सर्वे करून ,पारस येथील भूसंपादन केलेल्या जागेवर, सौर ऊर्जा प्रकल्प उभारू नये व त्याला स्थगिती देण्यात यावी अशी एकमुखी मागणी ,आ.देशमुख यांनी लाऊन धरली आहे.

 

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल