सामाजिक

पुणे येथे शिकण्यास असलेला २५ वर्षीय आशिष हरवला आहे.

मिळून आल्यास कळविण्याचे आवाहन

पुणे येथे शिकण्यास असलेला २५ वर्षीय आशिष हरवला आहे.

बार्शीटाकळी:
बार्शीटाकळी जि. अकोला येथील युवक चि. आशिष गजानन बोपुलकर वय 25 वर्ष हा मागील तीन वर्षापासून पुणे येथे शिक्षण व अभ्यास करण्याकरिता रूम भाड्याने करून भोसरी भागात राहत होता. तो अभ्यासू व हुशार आहे त्याचे नेहमी त्याचे घरी फोनवर बोलणे असायचे. दि 16/6/24 रोजी सकाळी त्याचे आईसोबत फोनवर बोलला .संध्याकाळी त्याचे आईने पुन्हा बोलायचं म्हणून फ़ोन केला तर त्याचा दिवसभर फ़ोन बंद येत होता .म्हणून पुणे येथे जाऊन त्याचा शोध घेतला तर त्याचे घरमालक कडून माहिती मिळाली. तो घरी अकोला जातो असे म्हणून माझे जवळून ऍडव्हान्सचे पैसे व त्याचे सामान घेऊन गेला. परंतु आशिष मात्र घरी परत आला नाही. मंगळवारी दि
.१८ जून २०२४ रोजी अकोला रेल्वे स्टेशनं वरील बाकावर आशिषची लॅपटॉप असलेली बॅग ,त्यात बंद मोबाईल व दुसरी कपडे असलेली बॅग लावारीस मिळून आल्याने त्याच्या घरातील मंडळी वा नातेवाईक काळजीत पडलेले आहे.
कृपया वरील फोटोतील युवक आपणास दिसून आल्यास अथवा मिळून आल्यास मोबाईल क्र .9420106605 वर संपर्क करावा अथवा श्री. अनंत पळसकर ,आसलकर वाडी मोठी उमरी अकोला या पत्यावर पोहचवण्याची कृपा करावी .
आपणास लागलेला खर्च भाडे देण्यात येईल .

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल