मनसेचे रस्त्यासाठी अभिनव आंदोलन. आंदोलकांनी खड्ड्यात अर्धे शरीर पुरून घेतले
http://https://youtu.be/9KOdXXe0JYU?si=Knh_EwFUZ-TF6DbE
बार्शीटाकळी मनसेचे रस्त्यासाठी अभिनव आंदोलन
आंदोलकांनी स्वतःला खड्ड्यात अर्धे पुरुन घेतले .
बार्शीटाकळी:
तालुक्यातील धाबा मार्गे जाणाऱ्या महान ते पातूर रस्त्याची चाळण झालेली आहे. त्यामुळे रस्त्यावरून येजा करायला अतोनात त्रास होत आहे. आतापर्यंत या रस्त्यावरून मार्गक्रमण करतांना अनेक नागरिकांचे अपघात झालेले आहेत. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामाचा मोठा गाजावाजा करण्यात लोकप्रतिनिधींनी कोणतीही कसर सोडली नव्हती. परंतु अद्यापही या रस्त्याच्या निर्मितीची प्रतिक्षाच आहे. नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे मनसेचे बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष सचिन गालट व मनविसेचे राज कोहर यांनी आज दि.०२ जुलै २०२४ पासून स्वतःला खड्ड्यात अर्धे पुरुन अभिनव असे आंदोलन सुरु केले आहे.. लिखित आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे समजते ..