निवडणूकमहाराष्ट्रराजकीयविशेष

मुर्तिजापूर मतदार संघात ‘फीनिक्स’ची उत्तुंग झेप

मुर्तिजापूर मतदार संघात ‘फीनिक्स’ची उत्तुंग झेप

श्याम ठक
बार्शीटाकळी:
येत्या विधानसभेच्या रिंगणात संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांना ओळखल्या जायचे ते अचानक चर्चेतून बाद झाले होते. त्यांच्या अस्तित्वा बद्दल चर्चेला उधाण आले होते. परंतु ‘फीनिक्स’ पक्षी ज्याप्रमाणे राखेतून पुन्हा उंचच उंच आकाशात झेप घेऊन आपण अजूनही जिवंत आहोत ह्याचा जाणून दाखलाच देतो. त्याचप्रमाणें मुर्तिजापूर मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीसाठी मांड ठोकणारे ,जनसामान्यांचे वाली ,युवकांच्या गळ्यातील ताईत ,कार्यसम्राट ख्याती प्राप्त व सामान्य कुटुंबातील तुमच्या आमच्या सारखाच एक असलेले सम्राटभाऊ डोंगरदिवे यांनी ब्रेक के बाद पुन्हा रणशिंग फुंकले आहे….
यावेळी मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी पहायला मिळत आहे.. अनेक इच्छुक गुडघ्याला बाशींग बांधून तयार आहेत. परंतु
विकासाचा ध्यास,युवकांची आस ,”सम्राटभाऊ डोंगरदिवे” सर्वांचेच खास
समाजातील उपेक्षितांचे आसवे पुसण्यासाठी ,त्यांच्या हक्कांसाठी सतत कार्यरत असणारे युवा नेतृत्व
“सम्राटभाऊ डोंगरदिवे”
“सामाजिक” कार्यासोबतच राजकीय क्षेत्रात कार्य करतांना,बहुजन समाजाच्या हितासाठी आणि कल्याणासाठी संघर्ष करणाऱ्या महामानवांच्या परिवर्तनवादी विचारांची जोपासना,गरीब ,शेतकरी व कामगार अशा जनसामान्यांच्या व्यथा आणि वेदना अनुभवत,त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा युवा नेता म्हणजेच अकोला जिल्हा परिषदेचे माजी सभापती व विद्यमान सदस्य सम्राटभाऊ डोंगरदिवे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गतिमान करण्यासाठी सतत धडपडणारा ,लोकशाही मुल्यांची जोपासना करून,वाटचाल करीत कार्य करण्याचा ध्यास घेतलेला जिल्ह्यातील एक वादळी नेता म्हणून सम्राटभाऊंची ओळख आहे. म्हणून त्यांच्या उमेदवारीचे सर्वच स्तरावर स्वागत होईल हे निच्छितच ..

सम्राटभाऊ डोंगरदिवे यांचा राजकीय प्रवास

राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्याला सुरुवात केल्यानंतर,सम्राटभाऊ डोंगरदिवे यांनी सर्वप्रथम राष्ट्रवादी व वंचित बहुजन आघाडीमध्ये कार्य केलेसर्वप्रथम हातगाव जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत विजयी झाले. २०१६ ते २०१९ या कालावधीत जिल्हा परिषद हातगाव गटाचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या लाखपुरी गटातून ते अपक्ष म्हणून स्वबळावर विजयी झाले. सध्या या गटाचे विद्यमान सदस्य आहेत.

जीवन -कार्याच्या प्रवासात आई , पत्नीसह कुटुंबाचे मोठे योगदान

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतांना,कार्यकर्त्यांची संघटन शक्ती तयार करणे. ग्रामीण भागातील विविध समस्या जाणून घेवुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे .परिवर्तनवादी चळवळीला गतीमान करण्याच्या कार्यप्रवासाला, सम्राटभाऊ डोंगरदिवे यांना त्यांच्या स्व.मातोश्री जीजाबाई यांचे आशीर्वाद.,मोठे भाऊ अशोकराव व त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षाताई यांच्यासह संपूर्ण कुटुंबाचे मोलाचे सहकार्य व योगदान लाभले आहे. भाऊ व पत्नी आणि कुटूंबातील प्रत्येक सदस्यांचा पाठिंबा व कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम,शेतकरी,शेतमजुरांचा आशीर्वाद ही भाऊंच्या यशाचे गमक म्हणता येईल.

लोकशाही मुल्यांची जोपासना करण्यावर भर !

मानवाच्या हितासाठी , कल्याणासाठी तसेच राजकारणाची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी स्वातंत्र्य,समता ,बंधुभाव आणि न्याय ह्या लोकशाही मुल्यांची जोपासना करण्यावर सम्राटभाऊ डोंगरदिवे यांचा विशेष भर असतो.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभामध्येही ,सभागृहात आपली भूमिका मांडताना,संविधान,लोकशाही मुल्यांची जोपासना करण्यासंदर्भात आग्रहपूर्वक मत मांडत असतात. या सोबतच न्यायाचा पुरस्कार आणि आंबेडकरवाद यासंदर्भातील महत्वही भाऊ पटवून देत असतात. संविधानाच्या माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक व्यक्तीला न्याय मागण्याचा अधिकार दिला . संविधान आणि लोकशाहीची जोपासना करणारा प्रत्येक व्यक्ती आंबेडकरवादी आहे असेही सम्राटभाऊ डोंगरदिवे सांगतात.

जिल्हा परिषद सभापतीपदी अविरोध निवड होण्याचा बहुमान !

गेल्या २९ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या दोन सभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये अपक्ष सदस्य सम्राटभाऊ डोंगरदिवे यांची विषय समीती सभापतीपदी अविरोध निवड झाली. हा बहुमान सम्राटभाऊंनी पटकावला. आपल्या सभापतीपदाच्या कार्याला योग्य तो न्याय देवून त्यांनी ती जबाबदारी समर्थपणे पार पाडली. सम्राटभाऊ डोंगरदिवे सध्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. आणि यापुढे मुर्तिजापूर विधानसभेचे नेतृत्व करून,मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विधानसभेत पाऊल ठेवायचे आहे. कुणावरही टिका न करता ,आपली रेघ मोठी करून ,त्यांना त्यांच्या ,मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या हिताचे कार्य करण्याची संकल्पना सत्यात उतरेल हे नक्कीच..

 

 

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल