पुर्णेचे जल राजराजेश्वराच्या पींडीवर
आतंकसेना शिवभक्त मंडळाची भव्य कावड
अकोला:
शहरातील परदेशीपुरा येथील शिवभक्तांनी पुर्णेचे पाणी आणून राजराजेश्वराला भल्या पहाटे जलाभिषेक केला .
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ह्या पवित्र महिन्यात अनेक सण उत्सवांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. त्यातच मनात भोलेशंकरा प्रती असलेली आस्था व श्रद्धा भक्तीभावाने ओतप्रोत होवून जाते. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाला जलाभिषेक केल्या जातो .. ह्यात शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्वदूर क्षेत्रात असलेल्याल शिवमंदिरात आजूबाजूच्या पवित्र नद्यांचे जल आणून जलाभिषेक केल्या जातो. आणि त्याचप्रमाणे अकोल्यातील रामेश्वर मंदिर परदेशीपुरा येथील युवकांनी आपल्या आंतकसेना शिवभक्त मंडळाच्या माध्यमातून वाघोली येथून पुर्णेचे पाणी आणून दुसऱ्या सोमवारी शहराचे आराध्यदैवत असलेल्या श्री राजराजेश्वर महादेवाला जलाभिषेक केला. या मंडळाचे सर्वच युवा कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने ह्या कावड यात्रेत सहभागी झाले होते .. त्यात प्रामुख्याने
आयोजक – शिवाय पांडे , आदित्य बौरासी , मोनू यादव , कुलदीप दुबे , सचिन यादव , जयदीप दुबे , अक्षय पाल व अमन बौरासी यांचा समावेश होता.