आरोग्य विभागक्राईमग्रामीण वार्तासामाजिक

वैद्यकीय पदवी नसलेल्या ,अकरावी पास तोतया बंगाली डॉक्टरचे पितळ उघड ….

पिंजर पोलिसांनी केली अटक! आरोग्य विभागाची चौकशी सुरू; बार्शीटाकळी तालुक्यातील प्रकार

 

वैद्यकीय पदवी नसलेल्या ,अकरावी पास तोतया बंगाली डॉक्टरचे पितळ उघड ….

पिंजर पोलिसांनी केली अटक! आरोग्य विभागाची चौकशी सुरू; बार्शीटाकळी तालुक्यातील प्रकार

ग्रामीण भागासह बार्शीटाकळी शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट…

डॉक्टरांना , ठोक विक्रेत्यांकडुन औषधीची थेट विक्री केल्या जाते . ते ठोक विक्रेते कोण ??

श्याम ठक
बार्शिटाकळी:
गेल्या कित्येक वर्षापासून बंगालमधील काही युवकांनी विदर्भामध्ये डॉक्टरकी पेशा सुरू केला आहे,असाच एक तोतया डॉक्टर तालुक्यातील सारकिन्ही या गावात गेल्या सहा महिन्यापासून वैद्यकीय व्यवसाय करीत होता, सोमवारी पिंजर पोलीस अचानक तोतया डॉक्टरच्या दवाखान्यात पोहोचले, मंगळवारी सकाळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र आर्या, महान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी किरण साबे, यांनी जेव्हा बोगस डॉक्टरकडे असलेल्या मेडिकलची तपासणी केली, त्यावेळी, मुदत संपलेलां काही औषधी साठा मिळाला, महागडे, इंजेक्शन आणि बॉम्बे मार्केट मधील बनावट औषधी साठा सुद्धा मिळाला आहे.
सोमवारपासून ताब्यात असलेल्या तोतया डॉक्टरची मंगळवारी आरोग्य पथकाने पूर्ण छानबिन केली, तेव्हा हा तोतया डॉक्टर केवळ अकरावी पास असल्याचे निष्पन्न झाले, त्यावेळी उपस्थित आरोग्य विभागालाही त्याचा धक्का बसला, याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र आर्या आणि त्यांची सर्व टीम चौकशी करीत आहे, पोलिसांनी तोतया डॉक्टरला अटक केली, या प्रकारामुळे बार्शीटाकळी तालुक्यात खळबळ माजली आहे. सर्व नागरिकांनी याबाबत अलर्ट राहून आपल्या गावात असलेल्या बंगाली डॉक्टरची तसेच स्थानिक व अधिकृत पदवी नसलेल्या डॉक्टरची चौकशी करावी . कारण अनेक डॉक्टरांनी दुसऱ्या राज्यातून अनधिकृतपणे BAMSच्या पदव्या आणून स्वतःच्या क्लिनिक मध्ये लावलेल्या आहेत. सजग नागरिकांनी त्याची पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. विश्वजीत मृत्युंजय विश्वास वय २१ वर्ष, राहणार हैदर बेलीया, पोलीस स्टेशन हाबरा, जिल्हा बराशात (कलकत्ता) असे त्या बोगस डॉक्टरचे नाव आहे, प्राप्त माहिती अशी मिळाली की एका लोकप्रतिनिधीच्या निकटवर्तीयाने पिंजर पोलिसांना या बोगस डॉक्टरची माहिती दिली त्यामुळे पोलीस बोगस डॉक्टरच्या निवासस्थानी पोहोचले, ठाणेदार गंगाधर दराडे यांनी या प्रकरणाची माहिती आरोग्य विभागाला दिली. त्यानंतर मंगळवारी सकाळी सर्व आरोग्य पथकाची टीम सारकिन्ही गावात दाखल झाली. डॉक्टरची पूरअधिकृत कागदपत्र काही आढळले नाही, उलट हा विश्वजीत विश्वास केवळ अकरावी पास असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या तोतया डॉक्टरकडे मुदत संपलेले इंजेक्शन, गोळ्या, सलाईन, औषधी बाटल्या, त्यामुळे आता प्रत्येक नागरिकांनी सावधानता बाळगून आपल्या जीवाशी खेळत असलेल्या अश्या बंगाली बोगस डॉक्टरला हुडकून काढावे, त्याच्याकडे असलेल्या प्रमाणपत्राची, कागदपत्राची पाहणी करावी, बोगस आढल्यास याची माहिती द्यावी, असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. या वेळी बार्शीटाकळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अशोक बांगर यांनी भेट देऊन माहिती घेतली. तोतया डॉक्टरची चौकशी बार्शीटाकळीचे गटविकास अधिकारी अशोक बांगर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र आर्या, महान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण साबे,ठाकूर आरोग्य सहाय्यक, आर ए कानकिरड, मंगला भगत आरोग्य सेविका, ए, के पवार ए एन एम, बी ए चिरंगे आरोग्य सेवक महान, आशाताई आंबेकर, विनोद काळंके सिकलसेल सहाय्यक, गावातील सरपंच रामेश्वर भीमराव आंबेडकर,प्रकाश आगे पाणीपुरवठा कर्मचारी, प्रभाकर सुखदेव आंबेकर,ग्रामपंचायत सदस्य, गणेश नारायण आंबेकर, सुनील काळे, विकाससिंग जाधव जमादार, सुभाष पारधी जमादार, सुनील काळे होमगार्ड व पोलीस कर्मचारी, चौकशी करीत आहेत, गावातील लोकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

असा झाला भंडाफोड
लोकप्रतिनिधींच्या एका खास व्यक्तीने त्या बोगस डॉक्टर संदर्भात पिंजर पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी सुद्धा खास व्यक्तीचा फोन असल्याने त्या बोगस डॉक्टरचे निवासस्थान गाठले, आणि छानबिन केली, आणि आरोग्य विभागाला माहिती दिली, पोलिसांनी कालपासून त्याच ठिकाणी ठिय्या दिला होता. आता त्या तोतया डॉक्टरला जेलची हवा खावी लागेल, त्या खास व्यक्तीमुळे या प्रकरणाचा भंडाफोड झाला, त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्याला धडा शिकविल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

चौकट
सध्या तालुक्यात बंगालीच नव्हे तर स्थानिक बोगस डॉक्टरांचा सुद्धा सुळसुळाट झाला आहे. बार्शीटाकळी शहरासह तालुक्यातील लहान लहान गावात ह्या झोलाछाप डॉक्टरांनी उच्छाद मांडलेला आहे. अनावश्यक औषधीचा वापर करून ते रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे. आरोग्य विभागाने याबाबतीत तातडीने पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. बंगाली डॉक्टर बाहेरचा आहे म्हणून त्याच्यावर कारवाई व स्थानिक बोगस डॉक्टरला मात्र मोकळीक? हे त्वरित बंद व्हावे जेणेकरून रुग्णांचे नाहक बळी जाणे थांबेल …
परराज्यातुन आणलेल्या परंतु मान्यताप्राप्त नसलेल्या पदव्यांचे फोटो लावून फसवेगिरी सुरु आहे.
यांच्याकडे तपासणी केल्यास एखाद्या मिनी हॉस्पिटल मागे टाकतील एवढा तामझाम दिसून येइल..स्टेरॉईड ,ॲंटीहिस्टामाईन ,प्रतीजैविक(ॲंटीबायोटीक )औषधी देवून रुग्णांना फसवत आहेत.
एकाच चिठ्ठीवर एकप्रकारचे घटक असलेले दोन ब्रॅंड लिहून हे बोगस डॉक्टर आपल्या वैद्यकीय अज्ञानाला जणू दुजोराच देत आहेत असे म्हटले तर वावगे ठरु नये …
चौकट
अशा अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडे औषधीसाठा कोणत्या ऐजंसी कडून आला ह्याची सुद्धा चौकशी होणे आवश्यक आहे. तालुक्यात अनेक डॉक्टर अनधिकृतपणे औषधीसाठा बाळगून,परस्पर रुग्णांना देतात. नुकतीच याविषयी कान्हेरी सरप येथे कारवाई झाल्याची माहिती आहे.
अन्न व औषधी प्रशासन योग्यरितीने कार्य करत आहेच त्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. फक्तं त्यांनी डॉक्टरांना औषधी पुरवठा करणाऱ्या ,ठोक विक्रेत्यांवर अंकुश लावावा अशी जनतेतुन मागणी आहे.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल