आरोग्य व शिक्षणआरोग्य विभागक्राईमप्रशासकीयसामाजिक

अकोला जिल्ह्यातील,बोगस डॉक्टरांपासुन सुटका होण्याचे संकेत 

पाच दिवसांत अधिकृत व अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची माहिती सादर करण्याचे आदेश 

बोगस डॉक्टरांपासुन सुटका होण्याचे संकेत
पाच दिवसांत अधिकृत व अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची माहिती सादर करण्याचे आदेश
श्याम ठक
बार्शीटाकळी:
अकोला जिल्हात बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरु .
पाच दिवसांत याबाबत माहिती देण्याचे आदेश.
सविस्तर वृत्त असे की नुकत्याच बार्शीटाकळी तालुक्यातील सारकिन्ही ह्या गावात एका अकरावी पास बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाल्याने,जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कामाला लागल्याचे दिसून येते. कारण जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दि.२१ जून २०२४ च्या पत्राने अधोरेखीत होते. त्यांनी जिल्ह्यातील आशा सेविका यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अधिकृत तसेच अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची माहिती असते.म्हणून आदेश प्राप्त झाल्यापासून पाच दिवसात  अधिकृत व अनधिकृतपणे दवाखाने असणाऱ्यांची संपूर्ण माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करायची आहे. ग्रामीण भागासह तालुक्याच्या ठिकाणी अनेक अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणारे असल्याची सुत्रांची माहिती आहे. ज्यांच्याकडे अधिकृत पदवी आहे त्यांच्याकडुन रुग्णाच्या हिताचा विचार केल्या जातो. कारण त्यांना शरीरशास्त्र शिकल्यामुळे माहिती औषधांचा परिणाम व दुष्परिणाम याचे ज्ञान अवगत असते. मानवी अवयवांवर चुकीचे परिणाम होवु नये म्हणून आवश्यक तेव्हाच रुग्णांना दिली जातात . याउलट मात्र अनधिकृतपणे व्यवसाय करणारी मंडळी अपायकारक औषधीचा भडीमार करून रुग्णांच्या जीवाशी खेळत असतात. स्टेऱॉईड व प्रतिजैविके असलेली औषधी सर्रासपणे लिहून देतात .. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी उचललेल्या पावलामुळे बोगस डॉक्टरां पासून रुग्णांची सुटका होईल असा विश्वास ठेवायला हरकत नाही.
चौकट
सध्या तालुक्यात बंगालीच नव्हे तर स्थानिक बोगस डॉक्टरांचा सुद्धा सुळसुळाट झाला आहे. बार्शीटाकळी शहरासह तालुक्यातील लहान लहान गावात ह्या झोलाछाप डॉक्टरांनी उच्छाद मांडलेला आहे. अनावश्यक औषधीचा वापर करून ते रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे. आरोग्य विभागाने याबाबतीत तातडीने पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. बंगाली डॉक्टर बाहेरचा आहे म्हणून त्याच्यावर कारवाई व स्थानिक बोगस डॉक्टरला मात्र मोकळीक? हे त्वरित बंद व्हावे जेणेकरून रुग्णांचे नाहक बळी जाणे थांबेल …
परराज्यातुन आणलेल्या परंतु मान्यताप्राप्त नसलेल्या पदव्यांचे फोटो लावून फसवेगिरी सुरु आहे.
यांच्याकडे तपासणी केल्यास एखाद्या मिनी हॉस्पिटल मागे टाकतील एवढा तामझाम दिसून येइल..स्टेरॉईड ,ॲंटीहिस्टामाईन ,प्रतीजैविक(ॲंटीबायोटीक )औषधी देवून रुग्णांना फसवत आहेत.
एकाच चिठ्ठीवर एकप्रकारचे घटक असलेले दोन ब्रॅंड लिहून हे बोगस डॉक्टर आपल्या वैद्यकीय अज्ञानाला जणू दुजोराच देत आहेत असे म्हटले तर वावगे ठरु नये …
चौकट
अशा अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडे औषधीसाठा कोणत्या ऐजंसी कडून आला ह्याची सुद्धा चौकशी होणे आवश्यक आहे. तालुक्यात अनेक डॉक्टर अनधिकृतपणे औषधीसाठा बाळगून,परस्पर रुग्णांना देतात. नुकतीच याविषयी कान्हेरी सरप येथे कारवाई झाल्याची माहिती आहे.
अन्न व औषधी प्रशासन योग्यरितीने कार्य करत आहेच त्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. फक्तं त्यांनी  डॉक्टरांना औषधी पुरवठा करणाऱ्या ,ठोक विक्रेत्यांवर अंकुश लावावा हि अन्न व औषध प्रशासनाला विनंती
गोपाल विश्वंभर ढोरे
सामाजिक कार्यकर्ता
सोनगीरी ता. बार्शीटाकळी
चौकट
अकोला जिल्ह्यातील गावांमध्ये गोरगरीब जनतेवर औषधोपचार करणाऱ्या   अधिकृत व अनधिकृत पणे व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांची गावनिहाय माहिती जसे १) संपुर्ण नाव २) वय १) लिंग ४) कायमचा पत्ता   कागदपत्र (पदवी ), ९) ग्रा.पं. परवाना, ७) नोंदणीचा दाखला, ८) संपर्क क्रमांक ९) कोणकोणत्या गावामध्ये व्यवसाय करीत आहे  १०) किती वर्षापासुन व्यवसाय करीत आहे. इत्यादी बाबींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल