आरोग्य विभागनगरपालिका

बार्शीटाकळी शहरात ठिकठिकाणी सांडपाणी रस्त्यावर

पावसाळ्याच्या तोंडावर रोगराई पसरण्याची दाट शक्यता..

बार्शीटाकळी शहरात घाणीचे साम्राज्य

नगर पंचायतच्या स्वच्छता विभागाचा ढिसाळ कारभार नागरिकांच्या जीवावर उठला .

बार्शीटाकळी: ०७ जून २०२४
बार्शीटाकळी शहरात ठिकठिकाणी नागरिकांच्या घरातील सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्यामुळे ,दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर साचलेले आहे. यामुळे रोगराईचा प्रादृभाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक प्रशासनाने पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील साफसफाईकडे लक्ष देण्याची आवश्यकता असतांना ,नगर पंचायतचा आरोग्य व स्वच्छता विभाग हातावर हात देवून बसून आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये.पूर्णवेळ लाभलेल्या मुख्याधिकारी ह्यांनी शहराच्या मूलभूत सोईसुविधेकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. नागरिकांना चालावयास योग्य रस्ते ,सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,शहरातील घनकचरा व्यवस्थापन व ईतरही महत्वाच्या समस्या निकाली निघायला हव्यात. अन्यथा पावसाळ्याच्या सुरूवातीलाच रोगराई पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

चौकट

सांडपाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी सदर ठिकाणी कर्मचारी पाठवत आहे.

पंकज सोनुने

मुख्याधिकारी

बार्शीटाकळी

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल