बार्शीटाकळीत आधी मतदान मगच बोहल्यावर…
मंगेश भातकर ह्या नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क ..
बार्शीटाकळी:
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी आज दि.२६ ऐप्रील २०२४ शुक्रवार रोजी महाराष्ट्रात होत असलेल्या लोकसभा मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून सुरुवात झाली. मतदान करण्यासाठी मतदारांचा उत्साह दिसून आला. सकाळी मतदान सुरु झाल्यावर ९ :३० वाजेच्या सुमारास बार्शीटाकळी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालय मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी मंगेश हरिदास भातकर ह्या नवरदेवाने आधी लोकशीच्या डोईवर अक्षता मगच बोहल्यावर अशी भूमिका घेत मतदानाचा हक्क बजावून लग्न मंडपात गेला. त्याच्या ह्या कृतीचे सर्वत्रच कौतुक होत आहे. मंगेश भातकर हा ,निशांत पतसंस्थेचे बार्शीटाकळी येथील पिग्मी प्रतिनिधी शिवा भातकर याचा भाऊ आहे.
लोकशाहीचा उत्सव असाच जोरदार व्हावा.. कानोसाने ह्या बातमीला प्रसिद्ध करून नागरिकांना मतदानासाठी उत्साहीत करण्याचे काम केले आहे…