क्राईम

बार्शीटाकळी मधून इर्टिगा कारची चोरी

बार्शीटाकळी मधून इर्टिगा कारची चोरी

बार्शीटाकळी:
शहरातील गजानन नगर भागात राहणाऱ्या नागरिकाची इर्टिगा कार चोरीला. पोलीसात तक्रार दाखल .

सविस्तर वृत्त असे की स्व. प्रदिप तुळशीराम इंगळे यांच्या नावे असलेली इर्टिगा MH 30 DB 4572 क्रमांकाची कार दि.२० मे २०२४ च्या मध्यरात्री त्यांच्या राहत्या घरासमोरुन चोरून नेल्याचे, काल दि.२१ मे २०२४ रोजी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.सदर इर्टिगा कारची किम्मत १० लाख ८१ हजार रुपये असल्याचे समजते. फिर्यादीने आपल्या तक्रारीत मोहम्मद शोहेब मोहम्मद अक्तर कुरेशी रा .लक्ष्मी कालनी अकोट फैल अकोला ,व राजरत्न मिलींद चक्रनारायण रा.इचा नागी ता. मंगरूळपीर जि. वाशीम या दोघांवर गाडी चोरून नेले बाबतचा संशय व्यक्त केला आहे. बार्शीटाकळी पोलीसांनी भांदवि कलम ३७९ नुसार अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरिक्षक शिरीष खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉंस्टेबल राजेश जोधारकर पुढील तपास करत असल्याची सुत्रांची माहिती आहे. बार्शीटाकळी पोलीसांनी काही दिवसापूर्वी मोटरसायकल चोर गॅंगला ताब्यात घेतल्यामुळे तब्बल १३ मोटरसायकली हस्तगत केल्या होत्या.. त्या कारवाईमुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. या गुन्ह्याचा देखील बार्शीटाकळी पोलीस योग्यरितीने तपास करुन फिर्यादी सुमित प्रदिप इंगळे याला त्याची चोरीला गेलेली कार मिळवून देतील अशी जनमानसात चर्चा ऐकायला येत आहे..

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल