क्राईम

चांदुर बाजार येथील तहसीलदार निघाल्या खदाड, महसुल विभागात खळबळ

चांदुर बाजार येथील तहसीलदार निघाल्या खदाड, महसुल विभागात खळबळ

अमरावतीः

आज दि. २४ मे रोजी चांदूर बाजार तहसीलदार गीतांजली नामदेवराव गरड यांच्यासह लिपिक किरण बेलसरे हे एसीबीच्या जाळ्यात अटकले असून याच्या विरोधात अमरावती लाचलुचपतविरोधी पथकाने कारवाई केली आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे यातील तक्रारदार यांनी दि. २८/०३/२०२४ रोजी तक्रार दिली की, त्यांचे वडीलांचे नावे असलेल्या शेतीचे वाटणी पत्रानुसार फेरफार करणेबाबतचा आदेश काढून देणेकरीता चांदुर बाजार तहसील कार्यालयातील लिपिक किरण बेलसरे यांनी स्वतः करीता व तहसिलदार गीतांजली गरड यांचेकरीता २५ हजार रुपये लाचेची मागणी केली आहे. सदर तक्रारीवरुन दिनांक २८/०३/२०२४ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दम्यान किरण बेलसरे यांनी तडजोडीअंती २० हजार रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केले. तसेच दिनांक ०८ मे रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान गितांजली गरड तहसिलदार चांदूर बाजार जि. अमरावती यांचे किरण बेलसरे, खाजगी इसम यांना लाच देण्यास प्रोत्साहन असल्याचे निष्पन्न झाले आहे. वरुन नमुद दोन्ही आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन चांदूर बाजार अमरावती ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदरची कार्यवाही मिलींदकुमार बहाकर पोलीस उपअधिक्षक, मंगेश मोहोड पोलीस उप अधीक्षक, विजया पंधरे, पो.नि. चित्रा मेसरे, पो.नि.पो. हवा प्रमोद रायपुरे, ना.पो.कॉ. युवराज राठोड, नितेश राठोड, महेंद्र साखरे, पो. कॉ. उमेश भोपते, वैभव जायले, ला.प्र.वि. अमरावती, चालक सपोउनि बारबुध्दे, किटकूले यांनी पार पाडली.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल