विशेषस्वच्छता अभीयान

बार्शीटाकळी पोलिस स्टेशन परिसराची साफसफाई.

द मराठा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र दिनी अभिनव उपक्रम.

बार्शीटाकळी पोलिस स्टेशनची साफसफाई.
द मराठा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र दिनी अभिनव उपक्रम.
श्याम ठक
बार्शीटाकळी:
शहरातील पोलीस स्टेशनचा परिसर स्वच्छ केला.
सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या शहरातील द ग्रेट मराठा  मंडळाच्या लहान ते मोठ्या कार्यकर्त्यांनी,०१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून,नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस कर्मचारी जिथे कर्त्यव्यास व निवासास आहेत.काही दिवसापूर्वी आलेल्या  वादळी वाऱ्याने, तुटलेल्या झाडांच्या फांद्यामुळे परिसरात कचराच कचरा साचला होता. सातत्याने कोणत्या ना कोणत्या सण उत्सव वा ईतर आयोजनासाठी पोलीसांच्या ड्युट्या लागत होत्या. त्यांना क्षणाचीही उसंत मिळत नाही.कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी तत्यांना सोपविलेली आहे. पोलिसामुळे आपण सुरक्षित आहोत. परंतु त्यांचे जीवन खूपच असुरक्षित आहे.ते जिथे कर्त्यव्य बजावतात तो परिसर स्वच्छ असावा . जेणेकरून पोलीस कर्मचाऱ्यांना कामात उत्साह जाणवेल. नेमके हेच हेरून द ग्रेट मराठा मित्र मंडळ बार्शीटाकळी यांच्याकडून बार्शीटाकळी पोलीस स्टेशन परिसराची साफसफाई करण्यात आली. त्यांच्या ह्या उपक्रमाचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी कौतुक केले. द ग्रेट मराठा मंडळाकडून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी  मोफत शिकवणी वर्ग चालविल्या जात आहे. यावेळी  द ग्रेट मराठा मंडळ बार्शीटाकळीचे सर्वच मुलेमुली,युवक -युवती ह्या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल