आरोग्य विभागविशेष

बार्शीटाकळी ग्रामीण रुग्णालयात ,आरोग्य कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक तपासणी संपन्न 

जागतिक कामगारदिवसाचे औचित्य साधून ह्या उपक्रमाचे आयोजन

  • बार्शीटाकळी ग्रामीण रुग्णालयात ,आरोग्य कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक तपासणी संपन्न
बार्शीटाकळी:
शहरातील ग्रामीण रुग्णालयात येथे कार्यरत कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की अहोरात्र नागरिकांना आरोग्यविषयक सोईसुविधा पुरविण्यात व्यस्त असलेल्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचे आरोग्य व्यवस्थित रहावे हा हेतू उराशी बाळगून ,प्रभारी वैद्यकीय अधिक्षिका डॉ.श्वेता वानखडे यांनी विविध आजारांच्या तपासण्या व आवश्यक लसीकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुनिता पवनीकर ,प्रीती आठवले ,शालीनी खाडे ,चित्रा सोनोने,गणेश डांगे ,शितल रहाणे,अनंत जाधव,प्रभाकर तिडके,अरविंद पारसकर ,लखन चौरे ,किरण बेहेनवाल ,धर्मपाल शिरसाट ,किशोर वर्गे व संभाजी भिसे यांची
रक्तदाब,हिमोग्लोबिन, हेपेटाइटिससह विविध आजाराचे निदान करून उपचार केले . तसेच  टिटनस टॉक्साईड ,हेपेटाइटिस बी लसीकरण सुद्धा राबविण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे. जागतिक कामगारदिवसाचे औचित्य साधून बार्शीटाकळी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. श्वेता वानखडे यांनी राबविलेल्या उपक्रमाची प्रशंसा होत आहे.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल